शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एकवटलेल्या विरोधकांना सत्तारांची धोबीपछाड; सेनेतून साधली ‘हॅटट्रिक’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:16 IST

कडवी झुंज देत अब्दुल सत्तारांनी खेचला विजय

ठळक मुद्देमुस्लिम मतदारांना शिवसेनेसोबत आणण्याचे जिकिरीचे काम केलेकाँग्रेस उमेदवारासहित ५ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. 

- शामकुमार पुरे 

सिल्लोड : सिल्लोड मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार यांनी विरोधकांसोबत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना कडवी झुंज देत अखेर विजयश्री खेचून आणली. काँग्रेसला ‘रामराम’ करीत सत्तारांनी शिवसेनेत येऊन यावेळी विजयाची ‘हॅटट्रिक’ साधली.

अब्दुल सत्तार यांना पहिल्यांदा मुस्लिम मतदारांना शिवसेनेसोबत आणण्याचे जिकिरीचे काम करावे लागले. या निवडणुकीत त्यांना काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडे जाणारी मते रोखून ती आपल्या पारड्यात घेण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. मराठा बहुल व हिंदू मतदारसंघात मूठभर मुस्लिम मतांच्या भरवशावर सत्तारांनी विजय संपादन केला. या पूर्वीचा मतदारसंघाचा इतिहास बघितला, तर कोणीही आतापर्यंत विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधलेली नाही.

या मतदारसंघात एकूण २ लाख ३८ हजार ४२८ मतदान आहे. त्यात केवळ ७३ हजार मुस्लिम मतदार असून उर्वरित अठरापगड जातीचे १ लाख ६५ हजार ४२८ मतदार आहेत. उलट अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर हे मराठा असतानाही त्यांना १ लाखाचा आकडासुद्धा पार करता आला नाही. सत्तार यांनी १ लाख २३ हजार ३८३ मते घेतली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दादाराव वानखेडे हे करिश्मा करतील असे वाटत होते. किमान १५ ते २० हजार मते घेतील, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाजही चुकीचा ठरला. काँग्रेसचे उमेदवार कैसर आझाद मुस्लिम मतदान खेचतील असे वाटत होते; पण अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला केवळ २ हजार ९६२ मतांवर रोखले. सिल्लोडमध्ये काँग्रेसची वाताहात झाली. याठिकाणी नोटाने २८४४ मतदान घेतले. याठिकाणी काँग्रेस उमेदवारासहित ५ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. 

भाजपचे सुमारे डझनभर नेते, संघ परिवारातील अर्धा डझन संघटना आणि समोर ताकदीने निवडणूक आखाड्यात उतरलेले अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचे मनसुबे धुळीस मिळवण्यात अब्दुल सत्तार यशस्वी झाले. याचे गमक अब्दुल सत्तार यांचे संघटन कौशल्य आहे. विरोधकांना वाड्या-वस्त्या, तांड्यावरील मतदारांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे वाटले नाही. अब्दुल सत्तार यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले. त्यांनी खेड्या-पाड्यांवर सर्वाधिक लक्ष दिले. शोषितांच्या झोपडीपर्यंत पोहोचून केलेल्या विकासकामांचा प्रचार केला. विरोधकांकडे असे सांगण्यासारखे फारसे मुद्दे नव्हते. अब्दुल सत्तार यांची एक जमेची बाजू म्हणजे ‘एमआयएम’ने त्यांच्या विरोधात सिल्लोडमध्ये उमेदवार दिला नाही.

अब्दुल सत्तारांना मिळालेली मते 1,23,383 पराभूत उमेदवार    पक्ष    मिळालेली मते-     प्रभाकर पालोदकर    अपक्ष       99,002-     दादाराव वानखेडे    वंबआ          7,817-     कैसर आझाद    काँग्रेस          2,962

विजयाची तीन कारणे...1. ‘एमआयएम’ने ऐनवेळी उमेदवार दिला नाही. 2. संघटन कौशल्य, विकासकामांचा जोरदार प्रचार केला.  3. प्रचाराच्या काळात वेळोवेळी विरोधकांना उघडे पाडण्याची कसर सोडली नाही.

पालोदकरांच्या पराभवाची कारणेवडील तथा सहकारमहर्षी माणिकदादा पालोदकर यांची मतदारांकडून सहानुभूती मिळाली नाही. आपणच विजयी होणार, ही अतिमहत्त्वाकांक्षा व अतिविश्वास नडला. निवडणुकीला सामोरे जाताना सत्तार यांच्यावर कडाडून टीका करण्याशिवाय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रभावी मुद्दा नव्हता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sillod-acसिल्लोडAurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तार