शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : रमेश गायकवाड यांची कॉग्रेसशी दगाबाजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 13:23 IST

निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जात दुरुस्तीच्या सूचना देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

ठळक मुद्दे शपथपत्रात गुन्हा नोंदच्या कॉलममध्ये दुरुस्ती राहिली होती.

औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आरपीआय (ड्रेमोक्रॅटिक)चे राज्याध्यक्ष तथा जि.प.  सदस्य रमेश गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांच्या शपथपत्रात गुन्हा नोंदच्या कॉलममध्ये दुरुस्ती राहिली होती. ही चूक निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिल्यानंतरही ती दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे अर्ज बाद झाला. चूक लक्षात आणून दिल्यानंतरही दुरुस्त न केल्यामुळे गायकवाड यांनी काँग्रेसशी दगाबाजी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पाराणी भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रमेश गायकवाड यांची किरकोळ चूक असताना त्यांच्या लक्षात आणून दिली का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी निवडणूक आयोगाकडून त्यांना दोन लेखी पत्र देण्यात आले आहेत. पत्रांच्या माध्यमातून उमेदवारी अर्जात चूक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर त्यांना चूक दुरुस्त करण्यास संधीही देण्यात आली. मात्र ती चूक दुरुस्त करण्यात आली नसल्यामुळे नियमानुसार अर्ज बाद करण्यात आल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.

यामुळे रमेश गायकवाड यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतल्यानंतरही जाणीवपूर्वक चूक ठेवली का?  चूक लक्षात आणून दिल्यानंतरही दुरुस्त का केली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. गायकवाड यांनी याअगोदर अनेक निवडणुका लढविल्या आहेत. ते एका जबाबदार पक्षाचे पदाधिकारी असताना अशी चूक कशी होऊ शकते, असा सवालही उपस्थित होत आहे. यामुळे गायकवाड यांनी काँग्रेसशी दगाबाजी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही गायकवाड यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली. या प्रकरणावर रमेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

काँग्रेससोबत दगाबाजीच केली- नामदेव पवारनिवडणूक आयोगाने रमेश गायकवाड यांच्या अर्जातील चूक दुरुस्त करण्यासाठी पत्र दिले. तरीही त्यांनी ती चूक दुरुस्त केली नाही. त्यांना निवडणूक लढवायची नव्हती. तरीही त्यांनी तिकीट घेतले. ही काँग्रेससोबत दगाबाजी असल्याचे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली. चूक दुरुस्त करण्याचे सांगूनही कायम ठेवली असेल तर हे काँग्रेसचे दुर्दैव आहे, अशी भावना जितेंद्र देहाडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद