शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चहा आणि पकोडेवाल्यांची फक्त चर्चा; प्रत्यक्षात त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:13 IST

पथविक्रेत्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देनिवडणुकीत नागरी प्रश्नांना बगलसरकारची दुटप्पी भूमिका आहे

औरंगाबाद : देशात सध्या चहावाला, पकोडेवाल्यांची चर्चा पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री करीत आहेत. त्यांच्या सन्मानाविषयी बोलले जाते; परंतु दुसरीकडे फुटपाथवरील छोट्या व्यावसायिकांना हुसकावण्यात येत आहे. त्यांना बेरोजगार करण्यात येत आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे सदस्य जम्मू आनंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

देशात सुमारे ३ कोटी, तर महाराष्ट्रात ५ लाख पथविक्रे ते आहेत. दररोज या वर्गांची साधारण ८ हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्यातून हजारो पथविक्रे ते स्वत:ची उपजीविका भागवत आहेत; परंतु त्यांना बेरोजगार करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आनंद यांनी केला. निवडणुका जनतेच्या प्रश्नांवर होताना दिसत नाहीत. शिवीगाळ, नक्कल अशा अर्थहीन मुद्यांवर निवडणूक होत आहे. आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे म्हटले जाते; परंतु त्याचे मानक कोणालाही माहिती नाही. विधानसभेच्या निवडणुकीत नॅशनल हॉकर्स फेडरेशन औरंगाबाद मध्यचे भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अभय टाकसाळ यांच्या पाठीशी असल्याचे जम्मू आनंद म्हणाले. याप्रसंगी अभय टाकसाळ, मनोहर टाकसाळ, डॉ. राम बाहेती, मधुकर खिल्लारे, किसनराज पंडित उपस्थित होते.

पथविक्रेता कायदा का लागू नाही?फेरीवाल्यांसाठी वर्ष २०१४  मध्ये पथविके्रता उपजीविका संरक्षण व पथ विक्रेय विनिमय कायदा २०१४ तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने त्यासाठी २०१६ मध्ये नियम तयार केले आहेत. प्रत्यक्षात ३ वर्षे उलटूनही हा कायदा लागू  नाही. औरंगाबादेत हा कायदा लागू करण्यापासून कोणी रोखले, हे समोर आले पाहिजे. हा कायदा लागू केला जात नसेल तर पथविक्रेता, फेरीवाल्यांवर कारवाईचाही अधिकार नसल्याचे जम्मू आनंद म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादGovernmentसरकार