शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सर्वाधिक ३४ उमेदवार 'औरंगाबाद पूर्व' मतदारसंघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 5:23 PM

सर्वांत कमी उमेदवार हे सिल्लोड मतदार संघात आहेत.

ठळक मुद्देपूर्व मतदारसंघात अर्ज भरताना ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून अनेक बंडखोर व अपक्षांनी माघार घेतल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय उमेदवारांचा आकडा समोर आला. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत. तर सर्वांत कमी उमेदवार हे सिल्लोड मतदार संघात आहेत. पूर्व मतदारसंघात ४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरताना ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 

५ आॅक्टोबर रोजी छाननी झाल्यानंतर ४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.त्यामुळे ३४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. हा आकडा जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत सर्वाधिक आहे. कुठल्या कारणाने येवो अथवा न येवो; परंतु सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्यामुळे पूर्व मतदारसंघ जिल्ह्यात चर्चेत आला आहे.  जास्त उमेदवार मैदानात असल्यामुळे प्रचाराची जोरदार रणधुमाळी यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. १२ दिवस प्रचारासाठी शिल्लक असून ९ तारखेपासून खऱ्या प्रचाराला रंगत येईल. असे राहणार चित्र

औरंगाबाद पूर्व : ३४ उमेदवार रिंगणातऔरंगाबाद पूर्वमध्ये ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी आणि समाजवादी पार्टीचे कलीम कुरेशी यांच्यात लढत होणार आहे. २०१४ मध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस  अशी पंचरंगी लढत झाली होती. या लढतीत राज्यमंत्री अतुल सावे यांचा निसटता विजय झाला होता. तर डॉ. गफ्फार कादरी यांना पराभवाला समोरे जावे लागले होते. 

औरंगाबाद पश्चिम : १२ उमेदवार रिंगणातऔरंगाबाद पश्चिम मतदार संघात शिवसेनेचे संजय शिरसाठ, एमआयएमचे अरुण बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाठ तसेच अपक्ष म्हणून भाजपाचे राजू शिंदे यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर राजू शिंदे आणि सेनेचे संजय शिरसाठ यांच्या लढत होण्याची चिन्हे आहेत. 

औरंगाबाद मध्य : १४ उमेदवार रिंगणातऔरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात शिवसेना विरूद्ध एमआयएम अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीमुळे ही  निवडणूक सध्या तरी चौरंगी दिसते आहे. २०१४ मध्ये या मतदार संघातून एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. तर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल पराभूत झाले होते.

सिल्लोड : ७ उमेदवार रिंगणात उमेदवारी मागे घेत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्यामागे उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर व शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्यात थेट लढत होईल, असेच चित्र सध्या आहे.

वैजापूर : १६ उमेदवार रिंगणात वैजापूर विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात असून, सध्या तरी शिवसेनेचे रमेश बोरनारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय पाटील चिकटगावकर यांच्यातच थेट लढत होईल, असे चित्र आहे. भाजपचे बंडखोर डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे बोरनारे यांची कोंडी झाली होती; परंतु सोमवारी दोघांनीही उमेदवारी मागे घेतल्याने पेच संपुष्टात आला. 

कन्नड : ८ उमेदवार रिंगणातकन्नड विधानसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई  हर्षवर्धन जाधव व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे आमने-सामने असून, दोघेही अपक्ष आहेत. भाजपचे जि. प. सदस्य किशोर पवार यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर हर्षवर्धन जाधव यांचीही डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.

फुलंब्री : १३ उमेदवार रिंगणात फुलंब्री विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ बागडे व  काँग्रेसचे डॉ.  कल्याण काळे या दोघांमध्ये थेट लढत झाली होती. यावेळीही बागडे व डॉ. काळे यांच्यातच थेट लढत होण्याची शक्यता आहे. 

पैठण : १५ उमेदवार रिंगणातपैठण विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याही वेळी शिवसेना                 विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होणार  असल्याचे चित्र दिसत असले तरी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांपुढे वंचित बहुजन आघाडीचे मोठे आव्हान राहणार आहे. 

गंगापूर : १४ उमेदवार रिंगणात गंगापूर विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी भाजपचे प्रशांत बन्सीलाल बंब व राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष अण्णासाहेब माने यांच्यातच थेट लढत होईल, अशी स्थिती दिसत आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वsillod-acसिल्लोडAurangabadऔरंगाबाद