शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : उमेदवारी अर्ज बाद होण्यामागे बागडे यांचे षड्यंत्र; रमेश गायकवाड यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 14:16 IST

निवडणूकीला न्यायालयात आव्हान देणार

ठळक मुद्देऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आरपीआय (ड्रेमोक्रॅटिक)चे उमेदवार उमेदवारी दिल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाचे आभार

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मानसपुत्र असलेल्या राजू शिंदे यांच्यासाठी माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला आहे. औरंगाबाद पश्चिम मधून उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्या विरोधातील याचिका मागे घेतल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आरपीआय (ड्रेमोक्रॅटिक)चे राज्याध्यक्ष तथा जि.प.  सदस्य रमेश गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या शपथपत्रात गुन्हा नोंदच्या कॉलममध्ये दुरुस्ती राहिली होती. ही चूक निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिल्यानंतरही ती दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे अर्ज बाद झाला. यामुळे रमेश गायकवाड यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतल्यानंतरही जाणीवपूर्वक चूक ठेवली का?  चूक लक्षात आणून दिल्यानंतरही दुरुस्त का केली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. गायकवाड यांनी याअगोदर अनेक निवडणुका लढविल्या आहेत. ते एका जबाबदार पक्षाचे पदाधिकारी असताना अशी चूक कशी होऊ शकते, असा सवालही उपस्थित होत आहे. यामुळे गायकवाड यांनी काँग्रेसशी दगाबाजी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाचे आभार देखील मानले. तसेच अर्ज बाद झाल्याच्या विरोधातील याचिका खंडपीठातून फेटाळण्याची शक्यता होती म्हणून मागे घेतली असे स्पष्टीकरण दिले. यासोबतच आपण आता रीतसर निवडणूकीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही  त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

निवडणूक आयोगाचे म्हणणे असे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पाराणी भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रमेश गायकवाड यांची किरकोळ चूक असताना त्यांच्या लक्षात आणून दिली का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी निवडणूक आयोगाकडून त्यांना दोन लेखी पत्र देण्यात आले आहेत. पत्रांच्या माध्यमातून उमेदवारी अर्जात चूक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर त्यांना चूक दुरुस्त करण्यास संधीही देण्यात आली. मात्र ती चूक दुरुस्त करण्यात आली नसल्यामुळे नियमानुसार अर्ज बाद करण्यात आल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमcongressकाँग्रेसHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे