शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

औरंगाबादच्या आमीदच्या हॅट्ट्रिकने महाराष्ट्राने साकारला पहिला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:14 AM

साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अ‍ॅस्ट्रो टर्फवर सुरूअसलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्या सलग तीन पराभवानंतर औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू आमीद खान याने नोंदवलेल्या गोलच्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान महाराष्ट्राने पहिला विजय साकार केला. महाराष्ट्राने कर्नाटक संघावर ४-२ अशा गोलने दणदणीत विजय मिळवला.

औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अ‍ॅस्ट्रो टर्फवर सुरूअसलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्या सलग तीन पराभवानंतर औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू आमीद खान याने नोंदवलेल्या गोलच्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान महाराष्ट्राने पहिला विजय साकार केला. महाराष्ट्राने कर्नाटक संघावर ४-२ अशा गोलने दणदणीत विजय मिळवला.या सामन्यात औरंगाबादच्या आमीद यानेच जबरदस्त कामगिरी करताना ११ व्या मिनिटाला गोल करीत महाराष्ट्राचे गोलचे खाते उघडले. त्यानंतर आमीद खान याने आपला जादुई खेळ पुढे कायम ठेवताना ५0 व ४९ व्या मिनिटाला गोल करीत महाराष्ट्राची स्थिती मजबूत केली. प्रज्वल मोहोरकरने ५६ व्या मिनिटाला महाराष्ट्राचा चौथा गोल नोंदवताना संघाचा विजय निश्चित केला. कर्नाटककडून एन. एम. सूर्या याने ४१ व व्ही. सुरेश याने ५९ व्या मिनिटाला गोल करीत यजमानांना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशविरुद्धही महाराष्ट्रातर्फे एकमेव गोल आमीद खान यानेच केला होता. आज झालेल्या अन्य सामन्यांत हिमाचल प्रदेशने एसएससीबीचा ४ वि. ३ असा पराभव केला. त्यांच्याकडून वाशू देव याने ५३, ५६ आणि ५८ व्या मिनिटाला गोल करीत हॅट्ट्रिक साधली. झारखंडने मुंबई संघावर ४-0, ओडिशाने साई संघावर १-0 अशी मात केली. ड गटातील लढतीत नबीन कुंजूर याने ९ व्या, २७ व्या व ३५ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर स्टील प्लांट बोर्ड संघाने पंजाब अँड सिंध बँकेवर ३ विरुद्ध २ गोलफरकाने मात केली.शुक्रवारी रंगणारे सामनेस. ७ वा. : पंजाब वि. हिमाचल, स. ८.३0 वा. : चंदीगड वि. तामिळनाडू, स. १0 वा. : हरियाणा वि. मुंबई, दु. १ वा. : ओडिशा वि. कर्नाटक, दु. २.३0 वा. : उत्तर प्रदेश वि. दिल्ली, दु. ४ वा. पंजाब अँड सिंध बँक वि. हॉकी.