शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : वाळूज तोडफोडप्रकरणी १७ हल्लेखोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:20 IST

मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची पोलिसांनी शुक्रवारपासून धरपकड सुरू केली आहे.

ठळक मुद्देतीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ हल्लेखोरांना अटक केली आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची पोलिसांनी शुक्रवारपासून धरपकड सुरू केली आहे. तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ हल्लेखोरांना अटक केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी येथे सांगितले. 

गुरुवारी बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत हिंसक जमावाने परिसरातील जवळपास १०० कारखान्यांवर प्रचंड प्रमाणात दगडफेक करून तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. बंददरम्यान कारखान्यांवर दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दोषी हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कारखान्यांची तोडफोड व दगडफेक होत असताना पोलिसांनी बळाचा वापर केला असता तर जमाव पुन्हा हिंसक होऊन अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोडफोड करताना कैद झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  

हल्लेखोर पोलीस कोठडीतनुकसानीसंदर्भात उद्योजकांकडून रात्री उशिरापर्यंत ३५ तक्रारी देण्यात आल्या असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत निवृत्ती पवार, रवींद्र शेटे, बाळू पेंडगे, मदन गवळी, प्रभाकर साळुंके, सोपान बुरजे, सोमनाथ सुराशे, निकेश बाबर, सुदर्शन काळे, आनंद हुडेकर, मंगेश उदार, बळीराम गायकवाड, सूरज पा. जाधव, गजानन चोरमारे, रामेश्वर वानखेडे, संतोष डुकरे, अक्षय गायकवाड या १७ हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणArrestअटकWaluj MIDCवाळूज एमआयडीसी