शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

एमआयएम 'औरंगाबाद मध्य'चा गड राखणार की, पुन्हा घुमणार शिवसेना, भाजपचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 2:29 PM

मतदारसंघात ताकद कोणाची?

ठळक मुद्देशिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख मतदारसंघात भाजपाचे नगरसेवक जास्त 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीचा शंख वाजताच प्रमुख राजकीय पक्षांनी मतदारसंघ काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने बालेकिल्ला म्हणून अनेक वर्षे अधिराज्य गाजवले. अत्यंत नवख्या एमआयएम पक्षाने २०१४ मध्ये सेनेचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत आपला झेंडा लावला. सेनेने यंदा हा बालेकिल्ला परत हिसकावून घेण्यासाठी चंग बांधला आहे. या मतदारसंघात पाच वर्षांमध्ये राजकीय ताकद वाढविण्याचे काम भाजप, एमआयएम, शिवसेनेने केले आहे. सर्वात जास्त नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र, हा मतदारसंघ युतीत भाजपकडे नाही.

विधानसभा निवडणूक म्हटली की, कोणत्या पक्षाचे नगरसेवक सर्वाधिक आहेत, यावर राजकीय गणिते अवलंबून असतात. मध्य विधानसभा मतदारसंघात सध्या एमआयएमचे ११ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ सेनेचे अपक्षांसह १० नगरसेवक आहेत. भाजपने या मतदारसंघात पाच वर्षांमध्ये बरीच मुसंडी मारली आहे. २०१० मध्ये भाजपचे फक्त चार नगरसेवक होते. आता ही संख्या ११ पर्यंत पोहोचली आहे. दोन स्वीकृत सदस्यही आहेत. पाच वर्षांमध्ये भाजपने इनकमिंगवर भर दिला. माजी नगरसेवकांचीही फौज उभी केली. दुर्दैवाने हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडे नाही. युती तुटल्यास स्वबळाची वेळ आल्यास हा फौजफाटा कामाला येईल, असा विचार भाजपने केला आहे. मध्य मतदारसंघात चार अपक्षही आहेत.या अपक्षांचा कौलही महत्त्वपूर्ण आहे. त्यातील एक अपक्ष कीर्ती शिंदे स्वत: नशीब अजमावत आहेत. सेनेचे २००४ मध्ये ११ नगरसेवक होते. अपक्षांसह आज ही संख्या १० आहे. सेनेने पाच वर्षांत इनकमिंगवर कधीच लक्ष दिले नाही. उलट सेनेचे माजी नगरसेवक पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. 

एमआयएमसमोर आव्हान कोणते?जावेद कुरैशी बंडाच्या तयारीत आहेत. हे बंड थोपविणे एमआयएम पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडी अमित भुईगळच्या माध्यमाने उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कदीर मौलाना यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविण्याच्या तयारीत आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे थांबविणे एमआयएम पक्षाला सोपे नाही.

सेनेचे दहा वर्षांपासून दुर्दैव२००९ मध्ये मध्य विधानसभा मतदारसंघात सेनेचे ज्येष्ठ नेते प्रदीप जैस्वाल यांनी बंड केले. त्यांनी स्वतंत्र शहर प्रगती आघाडी स्थापन करून अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी सेनेचे उमेदवार विकास जैन यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये सेनेने जैस्वाल यांना पक्षात घेऊन तिकीट दिले. याचवेळी भाजपनेही स्वबळाच्या माध्यमातून किशनचंद तनवाणी यांना उभे केले. मत विभाजनाचा पूर्ण फायदा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीतही जलील यांनी या मतदारसंघातून ९९ हजार मतदान घेतले होते.

२०१९ लोकसभेची मध्यमधील स्थितीइम्तियाज जलील 99,450 चंद्रकांत खैरे 50,327हर्षवर्धन जाधव 30,210

२००९ मध्ये मध्यची स्थितीउमेदवार    एकूण मतेप्रदीप जैस्वाल    ४९,९६५अ. कदीर मौलाना    ४१,५८१विकास जैन     ३३,९८८

२०१४ मध्ये मध्यची स्थितीउमेदवार     एकूण मते इम्तियाज जलील    ६१,८४३ किशनचंद तनवाणी    ४०,७७०प्रदीप जैस्वाल    ४१,८६१विनोद पाटील    ११,८४२

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाShiv Senaशिवसेना