शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूर मतदारसंघ सेनेकडेच; रमेश बोरणारे यांना उमेदवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:20 IST

भाजपाने केला होता मतदारसंघावर दावा  

ठळक मुद्देगेले काही दिवस वैजापुर मतदारसंघ शिवसेनेला मिळेल की भाजपला असे वातावरण होते.

- मोबीन खान 

वैजापुर : शिवसेनेचा गड असलेल्या वैजापुर विधानसभेवर ‘भगवा’ फडकविण्यासाठी शिवसेनेने तालुका अध्यक्ष रमेश बोरणारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. युतीच्या औपचारिक घोषणेपूर्वीच शिवसेनेने सोमवारी काही उमेदवारांची यादी जाहीर केली.त्यात बोरणारे यांचा समावेश आहे.त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून दावा केलेल्या भाजपचा हिरमोड झाला आहे.दरम्यान, तालुक्यातून पहिला उमेदवारी अर्ज शिवसेनेचा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेले काही दिवस वैजापुर मतदारसंघ शिवसेनेला मिळेल की भाजपला असे वातावरण होते. तसेच २०१४ मध्ये सेना भाजपने ही जागा स्वतंत्र लढली होती. या पार्श्वभूमीवर 'भाजपा'ने या जागेसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. दरम्यान, सेनेतील एका गटाने बोरणारे यांच्या उमेदवारीला विरोध केले होते.मात्र, बोरणारे यांच्यावरच  विश्वास दाखवित ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म हातात देत 'पक्ष तुमच्या पाठिशी आहे, कामाला लागा, निवडून या' असे म्हणत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शिवसेनाच नाही तर भाजपच्याही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. 

दरम्यान, वैजापुर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व मागील ५ वर्षांपासून राष्ट्रवादीचे आ.भाऊसाहेब पाटिल चिकटगावकर हे करत आहेत. मात्र, यावेळी त्यांचे पुतणे अभय पाटिल चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी करून काका समोरच आव्हान उभे केले आहे.त्यामुळे विधमान आ.चिकटगावकर यांची उमेदवारी अजूनही ठरलेली नाही.आ.चिकटगावकर कधी भाजप,तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांची नावे त्यांच्यासोबत जोडली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून आ. चिकटगावकर हे मुंबईत तळ ठोकून आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक नुसताच  गुलाल आम्हीच उधळणार, असा दावा करीत आहेत.

भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ च्या तळ्यात-मळ्यातील भूमिकेमुळे ते सध्या येथील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.गेल्या काही दिवसापासून डॉ.परदेशी यांचे नाव शिवसेना पक्षासोबत जोडली जात होती. शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कुणाला रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या एक-दोन दिवसात याबाबत घोषणा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तूर्तास तरी वैजापुरातुन  राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019vaijapur-acवैजापूरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस