शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेतील इच्छुकांची आज मुंबईत बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:20 IST

युतीबाबत कल जाणून घेण्याची शक्यता

ठळक मुद्देकल जाणून घेण्याची शक्यता 

औरंगाबाद : शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक शनिवारी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११ वा. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणार आहे. भाजपने शिवसेनेला देऊ केलेल्या जागा मान्य आहेत की नाही, युती करायची की नाही, याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्याच्या बैठकीत राज्यातील सर्व इच्छुकांचा कल जाणून घेतील, अशी शक्यता आहे. 

या बैठकीला जिल्ह्यातून ज्यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या, ते सर्व उपस्थित राहणार आहेत. बैठकीला हजेरी लावण्यासाठी शुक्रवारी रात्री इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी मुंबईला रवाना झाले. बैठकीचे रूपांतर मेळाव्यात होणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि ज्यांनी शिवसेना भवन येथे उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या. त्यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. 

कल जाणून घेण्याची शक्यता भाजपकडून शिवसेनेला सध्या १२६ जागा देण्याची आॅफर देण्यात आली आहे.भाजप १४४ जागांवर लढेल आणि मित्र पक्षाला १८ जागा देईल. शिवसेनेने गेल्यावेळी जवळपास सर्वच जागा लढल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या हाती ६३ जागा लागल्या होत्या. १२६ पैकी किती जागा जिंकता येतील, याचा अंदाज शिवसेना सध्या लावत आहे. इच्छुक आणि आयारामांचे समाधान होत नसेल तर युतीचा निर्णय घ्यायचा की नाही, याबाबतचा कल शिवसेना बैठकीतून जाणून घेणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना