शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ३०१ उमेदवारी अर्ज घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:28 IST

पितृपक्षामुळे शुक्रवारी जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेण्यास सुरुवात केली असून, अधिसूचना जारी झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३०१ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पितृपक्षामुळे शुक्रवारी जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. फक्त दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. 

२८, २९ सप्टेंबरला सुटी असणार आहे. २ आॅक्टोबरलादेखील सुटी आहे. त्यामुळे ४ आॅक्टोबरपर्यंत ४ दिवसच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. त्यात ३० सप्टेंबर, १, ३ व ४ आॅक्टोबर या दिवसांत उमेदवारी अर्ज भरता येणे शक्य आहे.  पूर्व आणि कन्नडमध्ये प्रत्येक एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघनिहाय नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज नेल्याच्या माहितीचा आढावा घेतला. त्यानुसार पूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी ३०१ उमेदवारी अर्ज नेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पश्चिममध्ये सर्वाधिक ६५ अर्ज नेलेपश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक ६५ उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्याखालोखाल पूर्व मतदारसंघातून ५२, तर मध्य व गंगापूर मतदारसंघातून अनुक्रमे ३६ व ३५ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. उमेदवारी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवसाचा आकडा पाहता नऊ मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता दिसत आहे. मध्य मतदारसंघातून कीर्ती शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज नेला. पहिल्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. 

मतदारसंघ     उमेदवारी अर्ज संख्याफुलंब्री    १८सिल्लोड    १३कन्नड    २६वैजापूर    ३०गंगापूर    ३६पैठण    २६

औरंगाबाद

पूर्व    ५२पश्चिम    ६५मध्य    ३५एकूण    ३०१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक