शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
2
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
3
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
4
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
5
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
6
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
7
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
8
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
9
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
10
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
11
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
12
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
13
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
14
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
15
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
16
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
17
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
18
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
19
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
20
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला

औरंगाबाद जिल्ह्यातील लढती ठरतील लक्षवेधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:55 IST

मूळ प्रश्न बाजूला ठेवून भावनिक प्रश्नांचे भांडवल केले जाणार यात कुठलीही शंका नाही.

ठळक मुद्देसिल्लोड विधानसभा मतदारसंघाकडे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

- स.सो. खंडाळकर 

औरंगाबाद : उमेदवारी अर्ज भरायला तीन दिवसांचा अवधी आहे. एकाही महत्त्वाच्या उमेदवाराने अद्याप आपला अर्ज भरला नाही. उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर, छाननी झाल्यानंतर व अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर, पुरेसे चित्र स्पष्ट होईलच; परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील लढती लक्षवेधी ठरणार, गाजणार, जातीय समीकरणे मांडली जाणार, पैशांचा पुरेपूर वापर होणार, मूळ प्रश्न बाजूला ठेवून भावनिक प्रश्नांचे भांडवल केले जाणार यात कुठलीही शंका नाही.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघाकडे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. अब्दुल सत्तार यांच्या अस्तित्वाची लढाई तेथे बघायला मिळणार! कालपरवापर्यंत काँग्रेसचा तिरंगा झेंडा हातात घेतलेले सत्तार यांना शिवसेनेचा भगवा घेताना काहीही वाटले नाही. राजकारण किती सत्ताकेंद्रित असते, हेच सत्तार यांनी सिद्ध केले आहे. अर्थात, त्यांचा पराभव करण्यासाठी सत्तारविरोधक सारेच जण एकवटणार, ताकद लावणार, सिल्लोडची भाजपची मंडळी किती बंडखोरी करणार यावर ही निवडणूक रंगतदार होणार, याबद्दल शंका नाही. हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेची निवडणूक गाजवली. त्यांचा ट्रॅक्टर फॅक्टर अजूनही सर्वांच्याच लक्षात आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत. शिवस्वराज्य बहुजन पार्टीचे ते उमेदवार असतील; पण त्यांच्या पाठीमागे अनेक अदृश्य शक्ती राहतील, हे सांगणे न लगे. 

औरंगाबाद मध्यमध्ये अनेक उमेदवारांच्या उड्या पडत आहेत. एमआयएमसाठी मध्य खूपच प्रतिष्ठेचा राहणार आहे. याच मतदारसंघातून मागे आमदार बनलेले प्रदीप जैस्वाल हे आपले नशीब अजमावताहेत. भाजपकडून दगाफटका न झाला तरच जैस्वाल यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहील. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी या महत्त्वाच्या उमेदवारांशिवाय मध्यमधून छोट्या-मोठ्या पक्षांना उभे राहून न्यूजसेन्स व्हॅल्यू वाढवून घ्यायची आहे.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे राजेंद्र दर्डा यांनी प्रतिनिधित्व केलेले. आमदार निधी काय असतो, हे साऱ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले. मंत्रीपदाचा विकासासाठी किती प्रभावीपणे उपयोग करून घेता येतो, हे त्यांनी खेचून आणलेल्या डीएमआयसीवरून लक्षात आल्याशिवाय राहत नाही; परंतु यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी या मतदारसंघासाठी योग्य उमेदवाराच्या जणू शोधातच आहे. भाजप-सेनेतर्फे अतुल सावे हेच लढणार... पण शेवटपर्यंत बंडखोरीचे आव्हान त्यांनाही राहीलच. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुणाचा फायदा करून जातील, यावरही बरेचसे अवलंबून आहे. 

औरंगाबाद पश्चिमचे विद्यमान उमेदवार संजय शिरसाट यांनी अनेक वादविवादानंतर एबी फॉर्म मिळविण्यात यश मिळवले. तेथे भाजपची बंडखोरी होते का, ते पाहावयाचे. पैठण, गंगापूर, वैजापूर येथील लढती रंगतदार होतील. गंगापूरमधून विद्यमान आ. प्रशांत बंब यांना विजयाचा मार्ग वाटतो तेवढा सुकर नाही. वैजापूर यावेळी शिवसेना खेचून घेणार का, हा प्रश्न आहे. पैठणची जागा राखण्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांना यश मिळते का, हे सारेच पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सिल्लोडप्रमाणेच फुलंब्रीकडेही सर्वांचे लक्षसिल्लोडप्रमाणेच फुलंब्री मतदारसंघही गाजणार आहे, यावेळीही भाजपचे उमेदवार म्हणून हरिभाऊ बागडे यांनी शड्डू ठोकलेला आहे. भाजपच्या घटनेत उमेदवारीसाठी कुठलीही अट नाही, असा खुलासा करीत विधानसभेचे विद्यमान सभापती असलेल्या नानांना आगामी काळातही मोठमोठी पदे भूषवायची आहेत, ही त्यांची मनीषा लपून राहिलेली नाही.कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे हे मागच्या वेळी फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत. हे भान ठेवूनच ते मतदारसंघात सतत सक्रिय राहिलेले आहेत. त्यामुळे नानांना वाटते तेवढी ही निवडणूक सोपी नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभा