शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:38 IST

मतदारसंघ : औरंगाबाद पश्चिम : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील

ठळक मुद्देलोक प्रतिनिधींनी समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही.

औरंगाबाद : डोंगर माथ्यावर नैसर्गिक संपन्नता लाभलेल्या देवगडतांडा परिसरात कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय शासनाने केली नसल्याने ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. पाण्यासह सर्वच मूलभूत सुविधांसह शासनाच्या योजनांची सतत प्रतीक्षा करावी लागते. 

निवडणुकीनंतर ५ वर्षांत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट अथवा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींसह अन्य मंत्रिमहोदयांनी डोंगरावर येऊन नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही. पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या फेऱ्या अधूनमधून होतात. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गतवर्षी योजनेतून कचनेर डीएमआयसीला जोडणारा डांबरी रस्ता झाल्याने दळणवळणाची अडचण संपली आहे; परंतु पाण्यासाठी तांड्यावरील नागरिकांना शहरातून जार विकत आणून पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या टँकरची अखेरची फेरी गेल्या आठवड्यात शिवगडतांडा येथे आली. पश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाच्या तांड्यात शिवगडचा समावेश होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेकदा कॉल करून लाईनमनला बोलवावे लागते. डोंगरमाथ्यावर अनेक मोबाईलची सेवा नॉटरिचेबल असल्याने अशा वेळी महत्त्वाचा संपर्क साधणे अशक्यच. 

युवक बेरोजगारांचे थवेयेथील प्रत्येक कुटुंबातील मुले-मुली सुशिक्षित आहे. शासनाने युवकांसाठी किमान कौशल्यावर आधारित उपक्रम राबवून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे अनिकेत जाधव, शुभम राठोड,चरण राठोड, आदिनाथ राठोड, अभिषेक जाधव आदींचे म्हणणे आहे.  

पाण्यावाचून हालपश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव शिवगडतांडा मानले जाते. येथे नवीन उपक्रम शासनाने राबवून शासन दरबारी लोकप्रतिनिधीने लक्ष घालून पाणी प्रश्न सोडविण्याची गरज होती. - रुक्मिणीबाई राठोड

डोक्यावर आणतो पाणीम्हातारपणात डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी शेंदून किंवा जुन्या टाकीपासून डोक्यावर वाहून न्यावे लागते, शहराच्या जवळ असलो तरी पाणी नाही मिळत. - बेबीबाई राठोड 

आरोग्य केंद्र नाहीदूषित पाण्यामुळे मुले व महिला आजारी पडतात त्यांच्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक येथे तपासणीसाठी फिरकत नाही. शहरातील दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. - जनाबाई चव्हाण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019fundsनिधी