शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:02 IST

प्रशासनाची उडाली धावपळ 

ठळक मुद्देविधानसभा मतदारसंघनिहाय निर्णय कार्यालय 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर राबविण्यात आलेल्या पुरवणी मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार ४५६ नवीन मतदार वाढले आहेत. लोकसभेला २८ लाख १५ हजार २९९ मतदार होते. आता २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारसंख्या नऊ मतदारसंघांसाठी आहे. 

सर्वाधिक मतदारसंख्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघांत ३ लाख ३५ हजार मतदार आहेत. त्याखालोखाल फुलंब्रीत ३ लाख २५ हजार ४९१ तर औरंगाबाद मध्य मतदारसंघात ३ लाख २४ हजार ६६२ मतदारसंख्या आहे. त्यानंतर पूर्व मतदारसंघात ३ लाख १७ हजार ९५८, सिल्लोडमध्ये ३ लाख १६ हजार ९३८ एकूण मतदार झाले आहेत. गंगापूर मतदारसंघात ३ लाख १२ हजार ४०६, वैजापूरमध्ये ३ लाख ९ हजार ४२० तर सर्वाधिक कमी मतदार पैठण विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात २ लाख ९३ हजार ५९९ मतदार आहेत. १ जुलै ते २० जुलै या कालावधीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत अंतिम यादीचा मतदार आकडा प्रशासनाने जारी केला आहे. २० दिवसांतच ३४ हजार ४५६ मतदार वाढले आहेत. शहरी मतदारसंघातील मतदार वाढले असून, हे वाढलेले मतदार निवडणुकीच्या काळाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी ४५ दिवसांवरून ३५ दिवसांवर आल्यामुळे प्रशासनाची निवडणूक व्यवस्थापनासाठी धावपळ होणार आहे. २०१४ साली ३१ आॅगस्टला आचारसंहिता लागली होती. यावर्षी २१ दिवस उशिरा आचारसंहिता लागली. त्यातच दिवाळीपूर्वीच सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगाने कार्यक्रम आखला. प्रशासनाची धावपळ होईल.

निवडणूक निर्णय कार्यालय : सिल्लोड - उपविभागीय कार्यालय कोर्ट हॉल, कन्नड तहसील कार्यालय, फुलंब्री- मेल्ट्रॉन कंपनी, चिकलठाणा, औरंगाबाद - मध्य शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, पश्चिम - शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय, उस्मानपुरा, औरंगाबाद पूर्व- जिल्हा समादेशक कार्यालय, एन-१२, पैठण- तहसील कार्यालय, गंगापूर - तहसील कार्यालय, वैजापूर- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर येथे निवडणूक निर्णय कार्यालय असतील. 

टॅग्स :VotingमतदानAurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019