शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू; विद्यार्थ्यांनो मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरा लवकर

By विजय सरवदे | Updated: January 4, 2024 14:25 IST

महिनाभराच्या खंडानंतर पोर्टल सुरू; २५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर : अखेर महिनाभराच्या खंडानंतर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे महाडीबीटी पोर्टल सुरू झाले असून समाज कल्याण विभागाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महाविद्यालये व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, महाडीबीटी पोर्टलशी लिंक असलेल्या यूआडी पोर्टलमध्ये बिघाड झाल्यामुळे आधार कार्ड पडताळणी होत नव्हती. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलची सेवा विस्कळीत झाली होती. आता एकमेकाशी लिंक असलेले हे दोन्ही पोर्टल सुरळीत झाल्यामुळे ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरणे सुकर झाले असल्याचे समाज कल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन आणि नूतनीकरण ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून हे पोर्टल सुरू झाले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतीअगोदरच हे पोर्टल बंद पडले. त्यामुळे अकरावी, बारावी तसेच त्यापुढील पारंपरिक पदवी अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे व अन्य ठिकाणी धाव घेतली; पण पोर्टल उघडतच नव्हते. त्यामुळे अनेकांना मुदतीत अर्ज भरता आले नाहीत.

समाज कल्याण विभागाने या अनुषंगाने जिल्ह्यातील संबंधित सर्व महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत की, महाविद्यालयांच्या लॉगीनवर विद्यार्थ्यांनी सेंड केलेल्या शिष्यवृत्ती अर्ज आणि सोबतच्या कागदपत्रांची लवकरात लवकर पडताळणी करून परिपूर्ण अर्ज समाज कल्याण विभागाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावेत.

विद्यार्थ्यांनी गती घेण्याची गरजआतापर्यंत महाविद्यालयांच्या लॉगिनवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जापैकी अनु. जाती प्रवर्गाचे ९ हजार ४६४, ओबीसी प्रवर्गाचे ४ हजार ५००, विमुक्त जाती, भटक्या जमातीचे ७ हजार आणि विशेष मागास प्रवर्गाच्या जवळपास ८० ते ९० अर्ज दिसत आहेत. दरम्यान, गतवर्षी जिल्ह्यातील ६७ हजार २५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले होते. या तुलनेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गती घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती