शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

सोशल मीडियावर प्रेम जुळले; प्रियकराच्या ओढीने पुण्याहून अल्पवयीन प्रेयसी छ. संभाजीनगरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 12:39 IST

नातेवाईकांनी प्रेमी युगलास केले पोलिसांच्या स्वाधीन

वाळूज महानगर : सोशल मीडियावर प्रेम जुळले. प्रियकराच्या ओढीने पुणे येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी वाळुजला आली. यानंतर हे प्रेमप्रकरण अंगलट येईल, असे दिसताच नातेवाईकांनी गुरुवारी या प्रेमी युगलास एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीनही केले.

पुणे जिल्ह्यातील खडकी येथील रहिवासी प्रिया (१४, नाव बदलले आहे) या अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर वेरुळ येथील एका हॉटेलवर काम करणाऱ्या अक्षय (१८, नाव बदलले आहे) याच्या सोबत वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. या ओळखीनंतर सोशल मीडियावरून दररोज चॅटींग व संभाषणानंतर प्रिया व अक्षय यांचे प्रेम जुळले. विशेष म्हणजे, अक्षय याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून प्रियाचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. या प्रेमप्रकरणानंतर प्रिया व अक्षय या दोघांनी ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’च्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशातच प्रिया हिने ३ जुलै रोजी घरच्यांचा डोळा चुकवत प्रियकर अक्षय यास भेटण्यासाठी पुणे येथून बसने थेट वाळूजला आली. उद्योगनगरीत पोहोचताच प्रिया हिची चातकासारखी वाट बघणाऱ्या अक्षय याने तिला सोबत घेत पाटोदा येथे एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. प्रिया ही घरातून गायब झाल्याने तिच्या पालकांनी तिचा नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला. प्रिया हिच्याकडे असलेला मोबाइलही बंद असल्याने तसेच तिचा शोध लागत नसल्याने तिच्या पालकांनी प्रिया हिचे अपहरण झाल्याची तक्रार पुण्यात दाखल केली होती.

नातेवाईकांनी केले पोलिसांच्या स्वाधीनगत तीन दिवसांपासून प्रिया व अक्षय हे प्रेमीयुगल पाटोद्यात नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला होते. प्रिया ही अल्पवयीन असल्याने तसेच ती अक्षयसोबतच राहण्याचा हट्ट धरीत असल्याने अक्षय याच्या नातेवाईकांनी प्रकरण अंगलट येईल या भीतीपोटी दोघांना सोबत घेऊन गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक संदीप शिंदे, महिला पोलिस कर्मचारी प्रियंका तळवंदे यांनी प्रिया हिचे समुपदेशन करून पुण्यात तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. प्रिया हिच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पुण्यातील पोलिस ठाण्यात दिल्याचे सांगितले. यानंतर पुणे पोलिस प्रिया हिच्या पालकांना सोबत घेऊन तिला आणण्यासाठी उद्योगनगरीकडे निघाले असल्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणAurangabadऔरंगाबाद