शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

प्रेमाचा दुखद शेवट; लॉजमध्ये प्रियकर-प्रेयसीची आत्महत्या, ३ दिवसांनंतर आढळले मृतदेह

By राम शिनगारे | Updated: August 3, 2022 19:57 IST

प्रियकर-प्रेयसी एकत्र लॉजमध्ये; ३ दिवसानंतर रूममधून दुर्गंधी आल्याने खळबळ उडाली, आढळले मृतदेह

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रेमसंबंधाचा शेवट वाईट पद्धतीने झाला. रेल्वेस्टेशन परिसरातील द ग्रेट पंजाब हॉटेलमधील २०५ नंबरच्या रुममध्ये प्रियकराने गळफास घेतला तर प्रेयसीने प्रियेसीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सागर राजेश बावणे (२२, रा. संभाजी कॉलनी, एन ६, सिडको) आणि सपना अंकुश खंदारे (२१, प्लॉट नंबर ३४, लक्ष्मीनगर मुकुंदवाडी) असे आत्महत्या केलेल्या प्रेमयुगुलांची नावे आहेत. दोघे आंतरजातीय असल्याचे समोर आले आहे. मृत युवक सागर बावणे याने २९ जुलै रोजी रेल्वेस्टेशन रोडवरील ग्रेट पंजाब हॉटेलमधील रुम नंबर २०५ बुक केली होती. त्या रुममध्ये सपना खंदारे ही ३० जुलै रोजी दाखल झाली. दोघांचे आधारकार्ड हॉटेलचालकांनी घेतले होते. रुममध्ये गेल्यानंतर दोघांनी कोणतीही ऑर्डर व्यवस्थापनाकडे केली नाही. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वच्छता कर्मचारी रुमच्या बाहेर झाडू मारीत असताना रुममधुन आतमधुन दुर्गंधी येऊ लागली. 

कर्मचाऱ्याने रुमचा दरवाजा वाजवला असता, आतुन प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांने हॉटेल व्यवस्थापकाला याविषयी माहिती दिली. हॉटेल व्यवस्थापकांनी तात्काळ वेदांतनगर पोलिसांना कळविले. त्यानुसार निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हिडिओ शुटिंग करीतच रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये सागर हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तर सपना ही बेडवर बेशुद्ध आढळून आली. दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या रुममध्ये पोलिसांना कोणत्याही प्रकारची सुसाईट नोट किंवा इतर साहित्य आढळले नाही. दरम्यान, सपना हरवली असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

मोबाईल फ्लाइट मोडवर टाकलासागर याने अत्महत्या करणाऱ्यापुर्वी मोबाईल फ्लाइट मोडवर टाकला होता. तर सपनाने मोबाईल घरीच ठेवला होता. पोलिसांनी मोबाईलचा फ्लाइट मोड काढल्यानंतर पहिल्या क्रमांकाला फोन केल्यानंतर तो सागरच्या लहान भावाला लागला. त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांना माहिती दिली. दोन्ही कुटुंबांनी दोघांचे प्रेमसंबंध असल्याची कल्पना नसल्याची माहिती पोलिसांना दिली. सागर हा बीएच्या दुसऱ्या वर्षात तर सपना १२ वीमध्ये शिक्षण घेत होती.

 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद