शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Love Aurangabad : दिवाळीपूर्वी शहर होणार स्वच्छ; महापालिकेने केले दहा दिवसांचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 15:34 IST

दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वी दहा दिवसांच्या स्वच्छता मोहिमेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे

ठळक मुद्देनागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनसहभागी नागरिकांना प्रमाणपत्र देणार

औरंगाबाद :  लव्ह औरंगाबाद मोहिमेंतर्गत शहर स्वच्छतेचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले असून, दिवाळीपूर्वी शहराची साफसफाई करण्याच्या हेतूने दहा दिवसांच्या स्वच्छता मोहिमेचे वेळापत्रक तयार केले आहे. ही मोहीम स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असणार आहे. मनपा कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांनी यात सहभागी होण्यासाठी दोन स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहेत.

दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वी दहा दिवसांच्या स्वच्छता मोहिमेचे वेळापत्रक तयार करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापक नंदकुमार भोंबे यांनी दिली. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेने दहा दिवसांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यात ४ नोव्हेंबरला झोन कार्यालयांतर्गत विभागनिहाय विशेष साफसफाई मोहीम घेण्यात येईल. ५ नोव्हेंबरला महापालिका उद्यान, ६ नोव्हेंबरला शहरातील गेट, ऐतिहासिक वास्तू, स्थळे, ८ नोव्हेंबरला झोनमध्ये विविध ठिकाणी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करणे, ९ नोव्हेंबरला महापालिका शाळा आणि रुग्णालये, १० नोव्हेंबरला शासकीय कार्यालय, ११ नोव्हेंबरला व्यावसायिक जागा, १३ नोव्हेंबरला झोनअंतर्गत येणाऱ्या सर्व दुभाजकांची साफसफाई करण्यात येणार आहे.

या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्यासाठी त्याअनुषंगानेही वेळापत्रक तयार केले आहे. ४ नोव्हेंबरला नागरिकांनी घराची साफसफाई करावी. ५ नोव्हेंबरला परिसरातील स्वच्छता, ६ नोव्हेंबरला गृहनिर्माण संस्था आणि वसाहती, ७ नोव्हेंबरला ९ झोनअंतर्गत होणाऱ्या मेगा सफाई मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा. ८ नोव्हेंबरला वृक्षारोपण मोहीम, ९ नोव्हेंबरला पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू बनविणे, १० नोव्हेंबरला सोशल मीडियावर शहर स्वच्छतेसंदर्भात आवाहन करणारे पोस्ट तयार करून नावीन्यपूर्ण कल्पना, सूचना कराव्यात. ११ नोव्हेंबरला मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ‘वॉल ऑफ ह्युमॅनिटी’अंतर्गत  घरातील जुने कपडे, वस्तू दान करणे तर १३ नोव्हेंबरला स्वच्छता कामगारांचे आभार मानणे, असे नियोजन करण्यात आले आहे. 

सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र देणारया मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. नागरिक, संस्था, संघटनांनी स्वच्छताविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भोंबे यांनी केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका