शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अति वेगाने जीव गमावला; भरधाव दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 18:50 IST

अपघातानंतर एक दुचाकी रस्त्यापासून दोनशे मिटर अंतरावर फेकली गेली.  तर बुलेटच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

पैठण ( औरंगाबाद): पैठण-पाचोड  रोडवरील जायकवाडी कालव्याच्या पुलालगत आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोन जण जागीच ठार झाले आहेत. नितीन कडुबा साबळे (२९, जोगेश्वरी वाळुज,औरंगाबाद ) व गणेश एकनाथ शेळके (३२, रा. खुंठेफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ) अशी मृतांची नावे आहेत. 

गणेश शेळके हा कुतुबखेडा येथे कुंकवाचा कार्यक्रम आटोपून मित्रा सोबत बुलेटवरुन पैठणकडे येत होता. तर, नितीन कडुबा साबळे पत्नीला 12 वीच्या परीक्षेसाठी पैठण येथील परीक्षा केंद्रावर सोडून पाहुण्यांकडे जाण्यासाठी पाचोडच्या दिशेने जात होते. कालव्याच्या वळणावर दोन्ही भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बुलेटवर पाठीमागे बसलेला युवक रस्त्यापासून दुर फेकला गेला तर गणेश एकनाथ शेळके व नितीन साबळे हे दोघे तरुण जागीच ठार झाले. अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले, रामकृष्ण सांगडे, सुधाकर चव्हाण, यांच्या सह  पो. काँ.अनिरुद्ध शिंदे , सुधीर वाव्हळ, गोपाळ पाटील, मनोज वैद्य, गौतम बनकर, रमेश शेळके, चंद्रकांत तारू आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 

वळणावर होतात सातत्याने अपघात अपघातानंतर एक दुचाकी रस्त्यापासून दोनशे मिटर अंतरावर फेकली गेली.  तर बुलेटच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. बुलेटवर पाठीमागे बसलेला व्यक्ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर फेकला गेला, यावरून या अपघाताची भीषणता समोर येतेय. दरम्यान, पैठण-पाचोड रोडवर कालवा पुलाच्या दोन्ही बाजुची वळणे जीवघेणी ठरत आहेत. इथे सातत्याने अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. येथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात