शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणाऱ्या २१ मशीन महापालिकेस सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:18 IST

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजातर्फे गुरुवारी गुलमंडी येथे आयोजित कार्यक्रमात महापालिकेस सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणा-या २१ मशीन सुपूर्द करण्यात आल्या.

औरंगाबाद : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजातर्फे गुरुवारी गुलमंडी येथे आयोजित कार्यक्रमात महापालिकेस सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणा-या २१ मशीन सुपूर्द करण्यात आल्या.सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड, उपाध्यक्ष विकास जैन, उपाध्यक्ष व प्रकल्पप्रमुख प्रशांत देसरडा, महासचिव महावीर पाटणी, भगवान महावीर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया यांच्या हस्ते महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांना या मशीन सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, बसवराज मंगरुळे, कल्याण काळे, नामदेव पवार, अनिल मकरिये, नगरसेविका कीर्ती शिंदे, राखी देसरडा, शिल्पाराणी वाडकर, राजू तनवाणी, त्र्यंबक तुपे, महेश माळवदकर, गोपाळ कुलकर्णी, सहप्रकल्पप्रमुख रवी मुगदिया, मनोज बोरा, स्वप्नील पारख, ललित पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरात कचराकोंडी निर्माण झाली असून, सॅनिटरी नॅपकीन बायोवेस्टचा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. महापालिकेला सुपूर्द करण्यात आलेल्या २१ मशीनमुळे शहरातील सॅनिटरी नॅपकीन नष्ट करून विल्हेवाटीस हातभार लागेल. प्रत्येकी २० हजार रुपये किमतीची ही मशीन आहे.या मशीन रेल्वेस्टेशन जैन श्रीसंघ, डीकेएमएम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, सिडको रॉयल ग्रुप, तेजस्विनी ग्रुप, सखी मंच महिला ग्रुप, जैनम महिला मंच ए. बी., रॉयल लायन्स क्लब, रवींद्र खिंवसरा, रवी मसाले-श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभा, सीमा सुभाष झांबड, आ. सुभाष झांबड, ए. एम. पी. इन्फ्र ा ग्रुप, श्री महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी, सकल जैन ब्ल्यू बेल परिवार, साई सिद्धांत असोसिएटस्, प्रसाद कुमार कुंकुलोळ, के. के. वेंचर्स, पी. यू. जैन होस्टेल, ओस्वाल जैन ट्रस्ट, सकल जैन समाज यांच्याकडून मिळाल्या.सकल जैन समाज देशासमोर आदर्शपैठणगेट येथून मुख्य शोभायात्रा सुरू होण्याआधी साधू-संतांनी महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचा संदेश दिला. ‘सकल जैन समाज एकत्र येऊन औरंगाबादेत महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा केला जातो. याची ख्याती संपूर्ण देशात पोहोचली आहे. मी खास या जन्मकल्याणक शोभायात्रेसाठी या शहरात आलो आहे,’ असा गौरव करीत आचार्य कुशाग्रनंदीजी म. सा. म्हणाले की, येथील सकल जैन समाजाने देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ही एकता, अखंडता अशीच टिकून ठेवा. भगवान महावीरांनी दाखविलेल्या आदर्श जीवन पद्धतीचा अवलंब प्रत्यक्ष जीवनात करा, असे आवाहनही आचार्यजींनी केले. मुनीश्री आगमसागरजी म. सा. म्हणाले की, अहिंसा धर्माचे सर्वांनी पालन करावे. आपल्यापासून कोणत्याही प्राणिमात्रास इजा होऊ नये, याची नेहमी काळजी घ्यावी, तसेच सकल जैन समाजाने शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.भगवान महावीरांचा संदेश ‘जिओ और जीने दो’ याचा विश्वात प्रचार करा, असे मार्गदर्शन पुनीतसागरजी म. सा. यांनी केले. यानंतर आचार्यजींनी मांगलिक दिले.महारक्तदान शिबिरात३५२ दात्यांचे रक्तदानऔरंगाबाद : सकल जैन समाज आणि भगवान महावीर मेडिकल फाऊंडेशनतर्फे गुरुवारी स.भु. महाविद्यालयाच्या प्रांगणावर घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात ३५२ दात्यांनी रक्तदान केले. सकाळी ११ वा. महारक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिरात समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शिबिरात रक्तदान करण्यासाठी युवक, महिला व युवतींनीही मोठा सहभाग नोंदविला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानाद्वारे एखाद्याचा प्राण वाचू शकतो. याच भावनेतून शिबिरात ३५२ दात्यांनी रक्तदान करून रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी आणि समाजसेवेत एक वेगळे योगदान दिले. घाटी रुग्णालय येथील विभागीय रक्तपेढी, लायन्स ब्लड बँक, महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल ब्लड बँक, भगवान महावीर मेडिकल फाऊंडेशन, अमृता ब्लड बँक, औरंगाबाद ब्लड बँक, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ब्लड बँक, लोकमान्य ब्लड बँक आदी रक्तपेढ्यांतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख डॉ. प्रकाश झांबड, डॉ. प्रकाश पाटणी, अध्यक्ष डॉ. सुनील साहुजी, सचिव डॉ. अनिल नहार, डॉ. सन्मती ठोले, डॉ. तुषार चुडीवाल, डॉ. शैलेश चांदीवाल, डॉ. नरेंद्र खटोड, डॉ. सुभाष लुणावत, डॉ. प्रफुल्ल संचेती, डॉ. सुशील बोरा, डॉ. गौतम जैन, डॉ. ईश्वर ललवाणी, डॉ. जितेंद्र कासलीवाल आदींसह रक्तपेढीतील डॉक्टर्स, कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.रोपांचे वितरणस.भु. प्रांगणात आ. सुभाष झांबड परिवारातर्फे नागरिकांना रोपांचे वितरण करण्यात आले. विविध प्रकारची रोपे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली. अनेकांनी रोपटे नेऊन झाडांचे संवर्धन क रण्याचा संकल्प केला.योगदान देणाºया परिवारांचा सत्कारभगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवासाठी विविध माध्यम आणि सेवेतून योगदान देणाºया परिवारांचा सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड यांच्यासह महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवAurangabadऔरंगाबादRajendra Dardaराजेंद्र दर्डा