शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

छत्रपती संभाजीनगरात दीड तासात जालना रोडवर दोघांना लुटले, पोलिस निष्प्रभ का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:15 IST

छत्रपती संभाजीनगरात रात्रभर गुन्हेगारांचा राजरोस वावर, पोलिस निष्प्रभ

छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षभरापासून शहरातील लूटमारीचे सत्र थोपविण्यात शहर तसेच जिल्हा पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. गुरुवारी पहाटे ४ ते ५.३० या दीड तासात ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी दोघांना लुटले. यात लातूरहून आई-वडिलांनी पाठवलेला डबा घेण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून ऑनलाइन पैसे घेत मोबाइल लंपास केला.

औसा तालुक्यातील असलेला फरानसैफ अक्रम खान (१७, रा. ह. मु. एन-६) हा एमजीएम महाविद्यालयात शिकतो. आई-वडिलांनी बुधवारी रात्री त्याला एका ट्रॅव्हल्सद्वारे खाद्यपदार्थांचा डबा पाठवला होता. तो घेण्यासाठी पहाटे ४ वाजता फरानसैफ सेव्हन हिलच्या एका संगणकाच्या दुकानासमोर बसची वाट पाहत होता. त्यावेळी तोंड बांधलेले ट्रिपलसीट दुचाकीस्वर त्याच्याजवळ गेले. पैशांची मागणी करून मारहाण करत त्याला पायऱ्यांवर बसवले. बळजबरीने ५०० रुपये, मोबाइल काढून घेतला. मोबाइल पासवर्डसाठी धमकावून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करून घेत मोबाइल, रोख रकमेसह पोबारा केला. या घटनेमुळे फरानसैफ घाबरला. रात्री वडील शहरात आल्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात त्याने तक्रार दिली.

दीड तासांनी हायकोर्टासमोर लुटलेसुमित आव्हाड (१९, रा. न्यायनगर) हा तरुण गुरुवारी पहाटे ५.३० वाजता हायकोर्ट परिसरात मॉर्निंग वॉक करत होता. फरानसैफला लुटलेल्या दुचाकीस्वारांनीच त्यालाही अडवून धमकावत खिशातील मोबाइल हिसकावला. तिसऱ्या घटनेत अमित गव्हाळे (२९) यांना दि. ३ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता कांचनवाडीत अज्ञात तिघांनी नाहक मारहाण करून डोक्यात दगड घातला.

पोलिस निष्प्रभ का? -गेल्या वर्षभरापासून शहरात सातत्याने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिलांना लुटले जात आहे.-सोनसाखळी, मोबाइल हिसकावणाऱ्यांसह तोतया पोलिसांचा राजरोस शहरात वावर वाढला आहे.-मात्र, शहर, जिल्हा पोलिस निष्प्रभ झाल्याने गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढला. पोलिस ठाण्यांमधील डीबी पथक, गुन्हे शाखेच्या पथकांचा ‘अर्थपूर्ण’ कारवायांतच अधिक रस वाढल्याने त्यांना मूळ कामाचाच विसर पडलाय.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर