शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

५४ केंद्रांवर करडी नजर

By admin | Updated: April 20, 2015 00:32 IST

पंकज जैस्वाल , लातूर लातूर जिल्ह्यात ३४६ गावांमध्ये २२ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत़ या निवडणुकीत जिल्ह्यातील ११४२ मतदान केंद्रांपैकी

पंकज जैस्वाल , लातूरलातूर जिल्ह्यात ३४६ गावांमध्ये २२ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत़ या निवडणुकीत जिल्ह्यातील ११४२ मतदान केंद्रांपैकी ५४ केंद्रांवर मात्र निवडणूक आयोगाची करडी नजर आहे़ या दक्ष केंद्रांवर व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जात असून, सुक्ष्म निरीक्षकांद्वारे निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला जात आहे़ लातूर जिल्ह्यातील ३९५ पैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने ३४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत़ यासोबतच ४४ ठिकाणी पोटनिवडणुकाही होत आहेत़ निवडणुकीच्या रणधुमाळीत ८ हजार २०२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ काही गावात दुरंगी लढत, काही गावात तिरंगी लढत तर काही गावात चौरंगी लढती होत असल्याचे चित्र आहे़ प्रचारासाठी दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्याने ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी घरोघरी भेटीवर भर दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे़ गाव पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निवडणुकीचा प्रचार केला जात आहे़ त्यामुळे डिजीटल बॅनर, पोस्टर वॉर जोरात सुरु झाले आहेत़ निवडणुकीमुळे गटबाजीला उधान आल्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत़ महत्वाची खलबते करण्यामध्ये गावातील नेते-कार्यकर्ते यांच्या छुप्या बैठका सुरु आहेत़ प्रचारासाठी मोबाईल संदेश, सोशल मिडियाचा वापरही वाढलेला आहे़ एकंदरीत ग्रामपंचायतीची यावेळेची निवडणूक आधुनिक तंत्रज्ञानामुळे चुरशीची बनली आहे़ या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात १५५० इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन उपलब्ध आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे यांनी दिली़ मतदानानंतर या इव्हीएम मशीनमधील डाटा ट्रेझरीमध्ये सुरक्षीत ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ मतयंत्र वाहतूकीसाठी १०० बसेस व १४५ जीप लागणार आहेत़ निवडणूक कामासाठी ६ हजार कर्मचारी तैनात आहेत़ या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षणही देण्यात आले आहे़ रविवारी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पाही पूर्ण झाला आहे़ मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कालावधीत करावयाची कामे सांगितली़लातूर तालुक्यात बाभळगाव, सिकंदरपूर, बोरी, खोपेगाव येथील जि़प़ केंद्रीय प्रशालेतील चार केंद्र दक्ष केंद्र ठरविण्यात आले असून, उर्वरीत ५० केंद्रांची नावे त्या-त्या तालुक्यातील केंद्र प्रमुखांकडे पाठविली आहेत़ या केंद्रांवर व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवली जात आहे़ अतिरिक्त पोलिस व मनुष्यबळही तैनात करण्यात येत आहे़ ग्रामपंचायत निवडणुकीतील या ५४ केंद्रांना दक्ष केंद्र म्हणून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येत आहे़ या केंद्रावर प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावेत, अशा सुचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत़ ४लोकसभा - विधानसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्र जाहीर होतात़ परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत दक्ष केंद्र असतात़ तेथे अतिरिक्त पोलिस कर्मचारी, अतिरिक्त मनुष्यबळ, व्हिडीओ कॅमेरे तैनात असतात़ सुक्ष्म निरीक्षक या केंद्रांचा अहवाल आयोगाकडे पाठविणार आहेत़ ४दक्ष केंद्रांबाबत पोलिसांकडून अहवाल मागविण्यात आला होता़ गेल्या काही निवडणुकांमध्ये झालेल्या घटनांचा मागोवा पोलिसांनी घेतला आहे़ त्या अनुषंगाने दिलेल्या अहवालावरुन दक्ष केंद्र ठरविण्यात आले़