शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही आधी रसद पुरवा, आम्ही मनसे काम करू; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 10:19 IST

मनसे पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याची आणि त्यांना मानसन्मान देण्याची ग्वाही मंत्री भुमरे यांनी दिली,

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसेचे कार्यकर्ते तन आणि मनाने तुमचे काम करतील, तुम्ही फक्त रसद पुरवा, अशी साद मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महायुतीला घातली.

शहरातील आयएमए हॉल येथे शनिवारी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, मनसेचे संपर्क नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, दिलीप बनकर पाटील, दिलीप चितलांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी गळ्यात मनसेचे गमछे घातले होते.

नांदगावकर म्हणाले की, या निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान मिळावा, पक्षप्रमुखांचे छायाचित्र प्रचार रॅलीत असावे. मनसे १८ वर्षांपासून सत्तेत नाही. पक्षाचे कार्यकर्ते तन आणि मनाने तुमचे काम करतील, तुम्ही त्यांना धन द्या, अशी मागणीच त्यांनी उपस्थित महायुतीच्या नेत्यांकडे केली. यावर मनसे पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याची आणि त्यांना मानसन्मान देण्याची ग्वाही मंत्री भुमरे यांनी दिली, तर आ. शिरसाट यांनी मनसे आणि शिंदेसेनेचे एकच कुळ असल्याचे सांगितले.

मनसेला हव्या होत्या चार जागामनसेने महायुतीकडे चार जागांची मागणी केली होती. नंतर तीन जागांवर आम्ही आलो, परंतु ते एकच जागा देण्यास तयार झाले. शिवाय कमळ चिन्हावर निवडणूक लढा, असा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे नांदगावकर यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MNSमनसे