शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा रंगतदार होणार; छत्रपती संभाजीनगरात विनोद पाटील यांची उमेदवारीची घोषणा

By बापू सोळुंके | Updated: March 1, 2024 18:16 IST

विनोद पाटील यांच्या उमेदवारीमुळे आगामी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सुरू झाली.

छत्रपती संभाजीनगर: आगामी लोकसभा निवडणुकीचे पघडम वाजू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांसोबतच इच्छुकांकडूनही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी शुक्रवारी येथे सत्कार समारंभात औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली. विनोद पाटील यांच्या उमेदवारीमुळे आगामी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सुरू झाली.

उत्तरप्रदेशातील आग्रा येथील किल्ल्यात जेथे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने दगाफटका करून अपमानित केले होते. त्याच दिवाण -ए -आम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती समारंभाचे आयोजन सलग दुसऱ्या वर्षी विनोद पाटील यांनी केले होते. या यशस्वी आयोजनाबद्दल शहरातील नागरीकांच्यावतीने शुक्रवारी सिडकोतील मंगल कार्यालयात पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुष्पहार घालून आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  

या समारंभात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यात अग्रसेर असलेली मंडळी विचारपीठावर उपस्थित होती. यावेळी प्रत्येकांनी आपल्या भाषणात विनोद पाटील यांनी आगामी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. यात प्रा.रामदास गायकवाड, प्रा. चंद्रकांत भराट, संदीप बोरसे,  सुरेश वाकडे, माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद जंजाळ, रेखा वाहटुळे ,माजी उपमहापौर राजू शिंदे,   विजय वाहुळ, महेश गुजरे, सतीश तुपे, कलीम शेख आदींनी उत्तर देताना विनोद पाटील यांनी सक्रिय राजकारणात यावे आणि आगामी लोकसभेची निवडणू लढवावी,अशी मागणी केली. 

यावेळी प्रत्येक वक्ता सभागृहातील उपस्थितांना विनोद पाटील यांना आपल्याला खासदार करायचे असल्याचे आवाहन करीत. सभागृहातील मंडळीही त्यांना होकार देत. या सत्काराला उत्तर देताना विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. पाटील यांच्या घोषणेने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चित्र निर्माण होण्यास सुरवात झाली आहे.

महाविकास आघाडीकडून खैरे ? तर महायुतीकडून डॉ. कराड यांची चर्चामहाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे आणि महायुतीकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड  यांच्या नावाची तर एमआयएमकडून विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलील हे निवडूणक रिंगणार असतील असे चित्र आहे. आता विनेाद पाटील यांच्या उमेदवारीने आगामी लोकसभा निवडणूक चौरंगी होईल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाMaratha Reservationमराठा आरक्षण