शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील लढतींचे चित्र; मविआचे सहा उमेदवार जाहीर, महायुतीत तीन जागांचा तिढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 07:40 IST

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लोकसभेच्या आठपैकी सहा जागांवरील उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडी प्रचाराला लागली असून, महायुतीचे घोडे अजूनही तीन जागांवर अडले आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बुधवारी सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबादमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. खैरे यांच्या उमेदवारीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विरोध होता.

हिंगोलीचे विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील शिंदे गटात गेल्याने ठाकरे यांनी तिथे हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना संधी दिली आहे. परभणीत संजय ऊर्फ बंडू जाधव, तर उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर या विद्यमान खासदारांना संधी मिळाली आहे.

चारपैकी तीन मराठाउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठवाड्यात दिलेले चारपैकी तीन उमेदवार मराठा समाजाचे तर एक ओबीसी प्रवर्गातील आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीला शिवसेनेचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे. मराठा आरक्षण आंदोलन लक्षात घेऊन उमेदवार निवडल्याचे दिसून येते.

मराठवाड्यात मविआचे उमेदवारऔरंगाबाद - चंद्रकांत खैरे (शिवसेना-उबाठा)जालना - अद्याप जाहीर नाही (काँग्रेस)परभणी - संजय जाधव (शिवसेना - उबाठा) हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना, उबाठा) नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)लातूर - डाॅ. शिवाजी काळगे (काँग्रेस)उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना, उबाठा) बीड - अद्याप जाहीर नाही (राष्ट्रवादी श. प.) 

जालना-बीडमधून कोण? मराठवाड्यातील आठ जागांपैकी चार शिवसेनेकडे, तीन काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादीला (शरद पवार) सोडण्यात आली आहे.जालन्यातून काँग्रेस तर बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.जालन्यातून कल्याण काळे (काँग्रेस) तर बीडमधून बजरंग सोनवणे अथवा ज्योती मेटेयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

महायुतीत काय? भाजप - नांदेड, लातूर, बीड, जालनाशिवसेना (शिंदे) - अद्याप एकही उमेदवार जाहीर नाही.राष्ट्रवादी (अजित पवार) - अद्याप एकही उमेदवार जाहीर नाही. (औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोलीचा पेच कायम)

महायुतीची तिघाडीमहायुतीत औरंगाबाद, हिंगोली आणी उस्मानाबाद या तीन जागांचा तिढा कायम आहे. औरंगाबादच्या जागेवर भाजप आणि शिंदे गट, उस्मानाबादमध्ये भाजप-राष्ट्रवादी तर हिंगोलीत भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४