शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत तिरंगी, चौरंगी की पंचरंगी लढत ?; जलील यांच्या उमेदवारीने रंगत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 12:49 IST

एमआयएमच्या निर्णयाने या मतदारसंघाची समीकरणे कशी बदलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देआता लक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीकडे अब्दुल सत्तार यांचा निर्णय दोन दिवसात जाहीर

- नजीर शेख औरंगाबाद : काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम अशा तिरंगी लढतीचे चित्र सध्या तरी औरंगाबाद मतदारसंघात दिसते. हर्षवर्धन जाधव आणि अब्दुल सत्तार हे दोन आमदार येत्या दोन दिवसांत काय निर्णय घेतात यावरून ही लढत तिरंगी की पंचरंगी हे निश्चित होईल. एमआयएमच्या निर्णयाने या मतदारसंघाची समीकरणे कशी बदलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेने विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने आ. सुभाष झांबड यांना मैदानात उतरविले आहे. सोमवारी रात्री एमआयएमने आ. जलील यांची उमेदवारी जाहीर केली. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही आपल्या शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे उमेदवारी दाखल करण्याचे घोषित केले आहे. याशिवाय आ. झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज असलेले आ. अब्दुल सत्तार यांनीही अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आ. जाधव आणि आ. सत्तार उभे राहिल्यास मतदारसंघात पंचरंगी लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. 

खैरेंविरुद्धच्या मागील चार लढतींमध्ये काँग्रेसने प्रत्येक वेळी नवा उमेदवार दिला आहे. यापूर्वी चार वेळा दिवंगत नेते बॅ. ए.आर. अंतुले, रामकृष्णबाबा पाटील, उत्तमसिंग पवार आणि नितीन पाटील यांना उमेदवारी दिली. आता आ. झांबड उभे ठाकले आहेत. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील चार निवडणुकांत काँग्रेस जिंकत नसताना पक्षाकडून ही जागा जिंकण्याबाबत व्यूहरचना होत आहे, असे चित्र दिसत नाही. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना २०१४ मध्ये निवडून आल्यानंतरच २०१९ मध्येही आपल्यालाच लढायचे आहे, याची खात्री होती. काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या वर्षभर आधी उमेदवारांची चाचपणी आणि चर्चा सुरू होऊन अनेक इच्छुकांपैकी शेवटी एकाला उमेदवारी मिळत असल्याचे चित्र आहे. मग अनेक जण नाराजीचा सूर लावतात. काँग्रेसच्या या निर्णयप्रकियेचा अर्थातच शिवसेनेला अधिक फायदा होताना दिसतो.

यंदाही आ. झांबड यांची उमेदवारी घोषित होताना आ. सत्तार यांनी बंडाची भाषा केलीच. नेहमीप्रमाणे यंदाही खैरे यांच्याविरोधात वातावरण असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. मात्र, काँग्रेसमध्ये सध्याच्या घडीला तरी दुफळीचे चित्र आहे. त्यातच आता वंचित आघाडीकडून आ. जलील यांची उमेदवारी घोषित झाल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले आ. सतीश चव्हाण मंगळवारच्या दोन्ही पक्षांच्या एकत्रित मेळाव्याला गैरहजर होते. त्यामुळे त्यांची आ. झांबड यांना किती साथ मिळते, हेही पाहावे लागेल. 

सद्य:स्थितीत औरंगाबाद मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम हे तीन पक्ष मैदानात असणार आहेत, हे स्पष्ट होत आहे. शिवसेना आणि काँग्रेसने प्रचाराला सुरुवातदेखील केली आहे. अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली नाही. आ. जाधव आणि आ. सत्तार उमेदवारी अर्ज भरतात की नाही आणि दाखल केलेली उमेदवारी परत घेतात की नाही, यावर मतदारसंघात तिरंगी, चौरंगी की पंचरंगी लढत होणार हे स्पष्ट होईल.

सत्तार यांची बंडखोरी...निवडणुकीच्या आधीपासून आ. हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंवर शरसंधान करीत आपली उमेदवारी आधीच घोषित केली आहे. ते ३० एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. खैरेंचा विरोध हाच एकमेव निकष त्यांच्या उमेदवारीमागे आहे. दुसरीकडे आ. सत्तार यांनी जाहीर केलेली बंडखोरी किती दिवस राहते, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.

एमआयएमकडून उमेदवार जाहीर

एमआयएमचे आ. जलील यांच्या उमेदवारीला औरंगाबादेतील उच्चशिक्षित मुस्लिम आणि मौलानांनी काही दिवसांपूर्वी विरोध दर्शविल्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीत नसणार हे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, सोमवारी रात्री पुन्हा त्यांची उमेदवारी जाहीर केली गेली. देशातून भाजपचे सरकार हद्दपार व्हावे, असे वाटणारा मुस्लिम वर्ग आता एमआयएमच्या उमेदवारीकडे कसे पाहतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. एमआयएमच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होईल, या आरोपाचा आ. जलील यांनी इन्कार करीत आम्ही नव्हतो तेव्हाही काँग्रेसचा पराभव होत होता, असे स्पष्ट केले आहे.  

खैरेंना निवडणुकी आधीच विरोध मागील चार निवडणुकांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसलेली आहे. खा. खैरे यांच्याबाबतीत निवडणुकीच्या आधी विरोधी वातावरण असल्याचे चित्र निर्माण तयार होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत ते विजयी होत आल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन