शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन पर्यावरणाला पोषक; हवेच्या गुणवत्तेने गाठला औरंगाबादेत ‘ग्रीन’ झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 17:46 IST

लॉकडाऊनमुळे जवळपास महिनाभर शहरातील विविध उद्योग ठप्प होते. शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये बंद आहेत. वाहनांसह घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे.

ठळक मुद्देअतिसूक्ष्म धुलिकणांची (पी.एम. २.५) कमाल मर्यादा ओलांडली गेलेली नाही. हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन ५१ एवढे होते आणि ती समाधानकारक या सदरात मोडणारी

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने औरंगाबादची वर्णी रेड झोनमध्ये लागली आहे. पण लॉकडाऊनचा हा काळ शहराच्या पर्यावरणात्मक आरोग्याच्या दृष्टीने पोषक ठरत आहे. त्यामुळेच एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच हवेची गुणवत्ता याबाबतीत औरंगाबाद मागील काही दिवसांपासून सातत्याने ग्रीन झोनमध्ये आहे.

लॉकडाऊनमुळे जवळपास महिनाभर शहरातील विविध उद्योग ठप्प होते. शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये बंद आहेत. वाहनांसह घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे अगदी तुरळक वाहने रस्त्यांवरून धावताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्योगधंदे सुरू झाले असले तरी त्यांचे उत्पादन अजूनही पूर्वीच्या तुलनेत कमीच आहे. या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यावर आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यावर झाला आहे.

याशिवाय लॉकडाऊनमुळे शहरातील बांधकामे, विकासकामेही ठप्प आहेत. बांधकामांमुळे हवेत अतिसूक्ष्म धुळीचे कण पसरतात आणि त्यामुळेही हवेची गुणवत्ता खराब होते. उन्हाळ्यात कोरडी हवा असल्याने हवेतील सूक्ष्म धुलिकण तर अधिकच त्रासदायक ठरतात. यंदा मात्र औरंगाबाद या सगळ्या बांधकामांपासून मुक्त असल्याने हवेत धुलिकणांचे प्रमाण खूपच कमी आहे. सध्या हवेत अतिसूक्ष्म धुलिकण नसल्याने आणि हवा शुद्ध असल्याने रात्रीच्या वेळी आकाशही निरभ्र दिसत आहे. असे मत काही तज्ज्ञांनी मांडले.

नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सद्वारे दाखविण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार मागील एक ते दीड महिन्यापासून औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता सातत्याने चांगली आणि समाधानकारक या सदरात होत आहे. सोमवार, दि. ४ मे रोजी शहरातील हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन ५१ एवढे होते आणि ती समाधानकारक या सदरात मोडणारी होती. याशिवाय मागील काही दिवसांपासून दिवसभरात अतिसूक्ष्म धुलिकणांची (पी.एम. २.५) कमाल मर्यादा ओलांडली गेलेली नाही. बऱ्याचदा हवेच्या गुणवत्तेचे  मूल्यांकन ९० ते ९५ या दरम्यानही वाढलेले दिसते. दि.२० एप्रिल ते ४ मे असा आढावा घेतल्यास दि. २०, २२ व २९ एप्रिल रोजी हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन ४९ एवढे होते. ते चांगले या सदरात मोडणारे आहे. दि. २१ व  २३ एप्रिल रोजी हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन ५१ आहे. तर उर्वरित दिवसांमध्ये ते ५० एवढे होते. 

हवा प्रदूषणाच्या पातळीची गुणवत्ता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण