शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

लॉकडाऊन रद्दचा जल्लोष पडला महागात; खा. इम्तियाज जलील यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:49 PM

Filed charges against MP Imtiaz Jalil and his supporters लॉकडाऊन रद्दची माहिती मिळताच खा. इम्तियाज जलील यांचे २५ ते ३० समर्थक त्यांच्या घरासमोर जमले.

ठळक मुद्दे३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. खा. जलील यांनी यास विरोध दर्शवला आणि ३१ मार्चला जनता मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते

औरंगाबाद: जिल्ह्यातील प्रस्तावित लॉकडाऊन अंमलबजावणी होण्याच्या २ तास आधी जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. यामुळे लॉकडाऊनला तीव्र विरोध असणाऱ्या खासदार इम्तियाज जलिल यांनी समर्थकांसोबत रात्री १०. ४५ वाजेच्या दरम्यान रस्त्यावर जल्लोष केला. यावेळी कोरोना नियम आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याने खा. जलील यांच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात बुधवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यापासून खा. जलील यांनी यास विरोध दर्शवला आणि ३१ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनता मोर्चा काढण्याचे जाहीर केले . मंगळवारी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत लॉकडाऊनवरुन लोकप्रतिनिधींचा रोष उफाळून आला. यासोबतच अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी लॉकडाऊनच्या निर्णयास विरोध दर्शवला. यानंतर अंमलबजावणीस केवळ दोन तास बाकी असताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत रद्द केला. 

याची माहिती मिळताच संचारबंदी असतानाही लॉकडाऊनला तीव्र विरोध करणारे खा. इम्तियाज जलील यांचे २५ ते ३० समर्थक त्यांच्या घरासमोर जमले. तेव्हा खा. जलील यांनी घरासमोरील रस्त्यावर समर्थकांसह जल्लोष केला. याची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय पवार हे घटनास्थळी पोहोंचले. यावेळी खा. जलील आणि त्यांच्या समर्थकांनी मास्क न वापरणे, सोशल सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे अशा कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक पवार यांनी जमावास गर्दी न करता निघून जाण्यास सांगितले. यानंतर बुधवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यात खा. इम्तियाज जलील यांच्यासह माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, विकास एडके, आरेफ हुसैन, अब्दुल समीर अब्दुल साजेद, शारेक नक्षबंदी, इम्रान सालार, इसाख पठाण, अखिल सागर, मोहम्मद सोहेब यांच्याविरोधात भादवि कलम १४३, १८८ २६९,२७० सह कलम ११ महाराष्ट्र कोविड- १९ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

माझ्यावर कायद्यानुसार कारवाई करा दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खा. इम्तियाज जलील म्हणाले,  मंगळवारी रात्री लॉकडाऊन रद्द झाल्याची पुष्टी करण्यासाठी काही लोक माझ्याकडे आले होते. त्यांना मी एकत्र केले नव्हते. त्यांनी आनंदाच्या भरात मला उचलून घेतले. यावेळी इतके लोक जमा झाले आहेत याची माहिती नव्हती. आम्ही गरिबांसाठी लॉकडाऊनच्या विरोधात होतो ते साध्य झाले आहे. त्यानंतर मी मास्क घातला नाही आणि सोशल डिस्टसिंगचे पालन केले नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात माझी चूक झाली आहे, यामुळे पोलिसांनी यावर कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कायद्याची माहिती घेऊन बोलावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.     

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी