शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बहिष्काराचा पवित्रा घेणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचा कल शिवसेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 19:27 IST

सेना उमेवाराने गुरुवारी घेतली नगरसेवकांची भेट

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी मतदानसेनेकडून भेटी-गाठी सुरु  

औरंगाबाद : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था १९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी  रिंगणात दोनच प्रमुख उमेदवार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांशी कोणत्याही उमेदवाराने संपर्क साधला नव्हता. गुरुवारी मध्यरात्री सेना उमेदवाराने काही एमआयएम नगरसेवकांची भेट घेतली. आज मध्यरात्री अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मागील साडेचार वर्षांपासून मनपातील नगरसेवक चातकासारखी वाट पाहत होते. आपल्या कार्यकाळात ही निवडणूक होते किंवा नाही अशीही भीती अनेकांना वाटत होती. अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. आचारसंहिता लागू झाली. सेनेकडून अंबादास दानवे तर काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी यांचे नाव निश्चित झाले. निवडणूक रिंगणात दोघेच उमेदवार प्रमुख आहेत. अलीकडेच दोन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन ‘घोडेबाजार’ करणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मागील पंधरा दिवसांपासून अपक्ष, एमआयएम नगरसेवकांची चलबिचल वाढली होती. दरम्यान, एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी सदसद्विवेक बुद्धीने कोणालाही मतदान करा, अशी मुभा नगरसेवकांना दिली.

पक्षाने स्वातंत्र्य दिल्याने नगरसेवकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले. निवडणूक रिंगणातील एकही उमेदवार त्यांच्याशी संपर्क करीत नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत कोणी संपर्क न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निश्चयही एमआयएम नगरसेवकांनी व्यक्त केला होता. अखेर गुरुवारी रात्री सेना उमेदवार अंबादास दानवे यांनी कटकटगेट भागातील काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शुक्रवारी मध्यरात्री एका ठिकाणी सर्व एमआयएम नगरसेवक एकत्र बसणार आहेत. या बैठकीत अंतिम ‘निर्णय’होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अपेक्षित ‘मानपान’अशक्यऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दरवेळी घोडेबाजार ठरलेला असतो. मागील दहा वर्षांमध्ये या निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना ही निवडणूक लढविणे अशक्य झाले होते. यंदा निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांनी घोडेबाजारच्या मुद्यावर युती केली. ४त्यानंतर सोयीनुसार घोडेबाजार सुरू केला. नगरसेवकांना अपेक्षित ‘मानपान’आज तरी मिळणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालनाVidhan Parishadविधान परिषद