शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबाद तालुक्यात भीषण अपघात; एकाचा जागीच तर दुसऱ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 20:59 IST

जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळाले नाहीत उपचार

ठळक मुद्दे108 रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्राथमिक उपचार वेळेवर मिळाले नाहीत

खुलताबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील टापरगांवजवळ  रविवारी (दिं.10) सायंकाळी सहाच्या दरम्यान हतनुरकडुन येणाऱ्या मोटारसायकलला भरधाव छोटा हत्तीने उडवले. यात  एक जण जागीच ठार,तर दुसरा उपचारासाठी नेेताना मरण पावला. जगन्नाथ भानुदास थोरात (45), राजेंद्र सुखदेव थोरात (40 ) दोघे राहणार देभेगांव ता.कन्नड अशी मृतांची नावे आहेत.

बाबत अधिक सविस्तर माहिती अशी, कन्नड तालुक्यातील देभेगांव येथुन जगन्नाथ थोरात व राजेंद्र सुखदेव थोरात हे हतनुरकडुन मोटारसायकल ( क्रमांक एम.एच.20 सी.ई.7237) ने येत असतांना खुलताबाद कडुन कन्नडकडे जाणाऱ्या पीकअपने (क्रमांक एम.एच.20 ई एल-0610 ) जोरदार धडक दिली. यात जगन्नाथ थोरात यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी राजेंद्र सुखदेव थोरात यांना हतनुर प्राथमिक केंद्रात नेले, माञ तेथे कुठलेही उपचार न मििळाल्याने त्यााना खुलताबादला आणत असतांना वेरुळ जवळच त्यांचा मृत्यू झाला. 

उपचार न मिळाल्याने झाला मृत्यूराज्य शासना अंतर्गत सुरु असलेली आपतकालीन वैद्यकीय सेवा म्हणुन 108 ही रुग्णवाहिका रस्त्यावर धावतात. माञ, सध्या ही सेवा चांगलीच विस्कळित झालेली आहे. आता तर विना वैद्यकीय अधिकारी या रुग्ण वाहिका धावतांना दिसताय. रविवारी (ता.10) टापरगांव अपघातात जखमीस वेळेवर उपचार सेवा मिळाली असती तर जीव वाचला असता. माञ वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच सदरील रुग्णवाहिका अपघातग्रस्तस घेवुन टापरगांव ते खुलताबाद धावली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद