शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

वाहक -चालकाच्या सतर्कतेमुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:33 IST

हिंगोली : बस प्रवासात एका प्रवाशाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र बसमधील वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी रूग्णावर तत्काळ उपचार करता आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बस प्रवासात एका प्रवाशाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र बसमधील वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी रूग्णावर तत्काळ उपचार करता आले. चालक ब्रम्हाजी मुंढे व वाहक माधव चमकुरे यांच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी धोत्रे यांना जीवदान मिळाले.हिंगोली तालुक्यातील गुगुळपिंपरी येथील भिकाआप्पा जानोजी धोत्रे (६५) हिंगोली बस्थानकावरून अकोला-कंधारकडे जाण्यासाठी बसमध्ये बसले होते. बस जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली होती. यावेळी वाहक माधव चमकुरे तिकीट काढण्यासाठी गेले असता त्यांनी धोत्रे यांना तिकिटाची विचारणा केली. यावेळी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे लक्षात आले. सदर बाब वाहकाने चालकाच्या लक्षात आणून देताच बस वळवून परत आगारात आणली. यावेळी आगारातर्फे ही बस पोलीस ठाण्यात नेण्यास सांगण्यात आले. तेथे गेल्यानंतर सदर बस रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर बस थेट रुग्णालयात आणण्यात आली. सदर घटनेची माहिती डॉक्टरांना सांगितली. परंतु डॉक्टर उपचार लवकर करत नव्हते, असे लक्षात येताच बसमधील एका प्रवाशाने धोत्रे यांच्यावर आधी उपचार करा, बाकी कार्यवाहीचे नंतर पाहू असे म्हणताच डॉक्टरांनी उपचारास सुरूवात केली. यावेळी धोत्रे यांच्या नातेवाईकांशी मोबाईलवरून संपर्क केला. काही वेळातच नातेवाईक रुग्णालयात आले. परंतु धोत्रे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले. घटनेप्रकरणी जमादार थिटे यांनी पोलिसांत नोंद केली आहे.