शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या मजल्यावरून पडल्याने दोनवर्षीय चिमुकलीचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:52 IST

गॅलरीत खेळताना लोखंडी पहिल्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री मृत्यूू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गॅलरीत खेळताना लोखंडी पहिल्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री मृत्यूू झाला. ही घटना चिश्तिया कॉलनीत १२ आॅगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.उमेरा अकबर शेख (वय २ वर्षे, रा. चिश्तिया कॉलनी, सिडको एन-६) असे मृत बालिकेचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, अकबर शेख हे चिश्तिया कॉलनी घर भाड्याने घेऊन राहतात. ते हमाल काम करतात तर त्यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांना चार मुली आणि मुलगा आहे. मृत उमेरा ही जुळ्यांपैकी एक होती. १२ रोजी ते कामावर गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी घरात जेवण करीत होती, तर उमेरा ही तिच्या बहिणी आणि जुळ्या भावासोबत पहिल्या मजल्यावरील घरासमोरील गॅलरीत खेळत होती. नेहमीप्रमाणे ती आणि अन्य चिमुकले गॅलरीतून खाली डोकावतहोते.यावेळी अचानक उमेरा गॅलरीतील लोखंडी ग्रीलवर चढून खाली पाहू लागली. खाली डोकावताना तोल जाऊन ती खाली कोसळली. या घटनेनंतर आरडाओरड झाल्याने तिची आई आणि गल्लीतील अन्य लोकांनी तातडीने तिला एमजीएम रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्टरांनी तिची प्रकृती पाहून अधिक उपचारासाठी घाटीत जाण्याचा सल्ला दिला. घाटीत तिच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी रात्री उमेराची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू