शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

संगीत ऐकणं आनंदासोबतच आरोग्यदायी; सुरातून मेंदूला ऊर्जा, आनंददायी हार्मोन्सची होते निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:18 IST

मन प्रसन्न करण्यासाठी प्रहरानुसार राग ऐकल्यासही अधिक लाभ

- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : संगीत फार पूर्वीपासून माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक राहिले आहे. संगीत ऐकणे हा केवळ आनंद मिळवण्याचा मार्ग नसून, आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाणारे एक प्रभावी साधन बनत चालले आहे. आज अनेक वैद्यकीय उपचारपद्धतींमध्ये संगीताचा उपयोग केला जातो. तणावमुक्ती, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, मानसिक शांततेसाठी संगीत जादूसारखे काम करते. संगीतामुळे मेंदूत डोपामाइन व ऑक्सिटॉसिनसारखे आनंद निर्माण करणारे हार्मोन्स स्रवतात. ज्यामुळे तणाव कमी होतो. योगसाधना, ध्यान, रुग्णोपचार केंद्रे, मानसिक आरोग्य क्षेत्रामध्येही संगीताचा प्रभावी वापर केला जात आहे.

या रुग्णालयात संगीत ऐकवले जातेकोरोनादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना संगीत ऐकवले जात असे. ज्यामुळे त्यांच्या मनावर आलेला ताण आणि दडपण कमी होण्यास मदत झाली. शहरात शासकीय कर्करोग रुग्णालयात रुग्णांवर संगीत थेरपीद्वारे देखील उपचार केले जातात.

प्रहरानुसार रागदारी ऐकाम्युझिक थेरपी ही एक उपचार पद्धती आहे. संगीताचा वापर करून मानसिक, भावनिक व शारीरिक आरोग्य सुधारले जाते. माझ्याकडे मोठमोठ्या पदांवरील अधिकारी ताणतणावावरील थेरपीसाठी येतात. जुने लोक शेतातून परतले की, भजन ऐकायला जायचे. तणाव कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या रागदारी ऐकवतो. प्रहरानुसार रागदारी ऐकल्यास जास्त लाभ होऊ शकतो. तसेच, ओमकाराचा रियाजही महत्त्वाचा आहे. ब्रेन स्ट्रोक झालेल्या रुग्णांवरही मी संगीताद्वारे उपचार केलेले आहेत.-दीपक गिरी, संगीतकार

मानसिक स्वास्थ्य सुधारतेअस्वस्थ वाटणे, डिप्रेशन यांसारखे मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर मी संगीतातून यशस्वीपणे उपचार केले आहेत. रुग्णांना औषध दिल्यास त्यांची सवय होते. त्यामुळे संगीत थेरपी प्रभावी ठरते. रुग्णांना ‘गाणे गा’ हा उपाय हमखास सांगतो. गाणे ऐकताना मन केंद्रित झाले नाही, तरी गाताना लक्ष केंद्रित होते. संगीत उपचारांमुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. मनाला भावेल ते गाणे ऐका. फक्त ते रडके गाणे नसावेत.डॉ. अनंत कडेठाणकर, वैद्यकीय, संगीत तज्ज्ञ

विविध आजारांसाठी विविध रागांची मात्राविविध शारीरिक व्याधींवर संगीत आणि योग या दोन्हींद्वारे उपचार होऊ शकतात. दुर्धर आजारांवर शास्त्रीय संगीतामुळे काही अंशी नियंत्रण नक्कीच मिळवता येते. रागदारी ऐकल्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. राग मालकंस कॅन्सरदरम्यान दिल्या जाणाऱ्या किमोथेरपीत होणाऱ्या वेदना कमी करते. प्राण्यांवरही संगीताचा परिणाम होतो. राग दरबारी कानडामुळे मानसिक त्रास कमी होतो. राग हमीरमुळे हृदयविकार असणाऱ्यांना फायदा होतो. सकाळी तोडी राग ऐकल्यास दिवस चांगला जातो. सामान्य प्रसूतीसाठी यमन राग ऐकायला हवा.- प्रसाद साडेगावकर, सुप्रसिद्ध सुगम गायक

टॅग्स :musicसंगीतchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर