शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

प्राणरक्षक जीवनदायिनी

By admin | Updated: August 25, 2014 00:26 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत राज्यात २६ जानेवारीपासून मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवेला प्रारंभ केला.

बापू सोळुंके, औरंगाबादसार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत राज्यात २६ जानेवारीपासून मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवेला प्रारंभ केला. तेव्हापासून १५ आॅगस्टपर्यंत ८ हजार ५११ कॉल नियंत्रण कक्षाला आले. यापैकी ४ हजार ३६ रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. यात हृदयविकाराचा झटका आलेल्या ४६ रुग्णांचा, तर अपघातामधील ७५८ जणांचा समावेश आहे.औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० अ‍ॅम्ब्युलन्स, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे २० आणि १० अ‍ॅम्ब्युलन्सची त्यात भर पडली. जिल्ह्यात प्रत्येक ३० किलोमीटर अंतरावर या अ‍ॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. अ‍ॅडव्हान्स लाईफ सेव्हिंग सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाईफ सेव्हिंग सपोर्ट, अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या या अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. एएलएस अ‍ॅम्ब्युलन्समध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास तातडीचे उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यात व्हेंटिलेटर सिस्टिम, ईसीजी मशीन आणि इतर महत्त्वाची जीवनदायी औषधी उपलब्ध असतात. अशा १० एएलएस अ‍ॅम्ब्युलन्स औरंगाबाद जिल्ह्यात आहेत, तर उर्वरित अ‍ॅम्ब्युलन्स या घात, अपघातामधील जखमी, प्रसूती वेदना होत असलेल्या स्त्रिया, जळालेले, विषबाधा, सर्पदंशाचे रुग्ण यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी काम करीत आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. आर.टी. चव्हाण यांनी सांगितले की, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत ही सेवा दिली जाते.