शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हेल्मेट नसल्यास लायसन्स होणार रद्द, नव्या वाहतूक नियमांमध्ये दंडाच्या कडक तरतुदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 4:36 PM

वाहतूक नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची तब्बल २६ महिन्यांनंतर राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विनालायसन्स वाहन चालविणाऱ्यांना पाच हजारांचा दंड, तसेच हेल्मेट नसल्यास लायसन्स रद्द होणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे.

नंबर प्लेटवर दादा, मामा तर हजाराचा दंडवाहनांवर विशिष्ट नंबरच्या माध्यमातून दादा, मामा अशी नावे लिहिली जातात. परंतु अशा प्रकारे दादा, मामा लिहिणेही आता चांगलेच महागात पडणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट बसविणाऱ्यांना यापूर्वी २०० रुपये दंड केला जात होता, तो आता एक हजार रुपये करण्यात आला आहे.

थकीत दंडही नव्या नियमानुसार आकारणारवाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाइन पद्धतीने दंड लावण्यात येतो. परंतु अनेक वाहनचालक वेळीच दंड भरत नाहीत. आरटीओ कार्यालयाकडून सुधारित कायद्यानुसार दंड आकारणीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे यापूर्वी दंड थकलेला आहे, त्यांच्याकडून नव्या नियमानुसार दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.

कारवाईचा बडगाअनधिकृत वाहनचालक, विनालायसन्स, लायसन्स संपल्यानंतरही वाहन चालविणे आदींबाबत आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. आरटीओ कार्यालयाला यंदाच्या आर्थिक वर्षात २८९ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. सुधारित कायद्यामुळे आता हे लक्ष्य आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गुन्हा----जुना दंड- नवा दंड- परवाना नसताना वाहन चालविणे-५००-५०००- परवाना रद्द असताना वाहन चालविणे-५००-१०,०००- लायसन्सची मुदत संपल्यानंतरही वाहन चालवणे- ५००- १०,०००- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (दुचाकी, तीनचाकी)-१०००-१०००- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (कार)-१०००-२०००- वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास(जड वाहने)१०००- १००० ते ४०००- सीट बेल्ट नसणे-२००-१०००- विनाकारण हॉर्न वाजवणे ५०० - १,००० ते ५,०००- विनाविमा वाहन ३०० ते २,००० - २,००० ते ४,००

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद