शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परवाना शुल्काचा व्यापाऱ्यांवर बोजा ? महापालिकेची शुल्क वसूल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 12:56 IST

Aurangabad Municipal Corporation महापालिकेच्या महसुलात भर घालण्यासाठी राज्य शासनाने ८ वर्षांपूर्वी शहारातील व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देलोकलेखा समितीला आता अनुपालन अहवाल सादर करावा लागणार

औरंगाबाद : शहरातील व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचे आदेश २०१३ मध्ये राज्य शासनाने महापालिकेला दिले होते. मात्र, प्रशासनाने मागील ८ वर्षांमध्ये अंमलबजावणी केली नाही. राज्याच्या लोकलेखा समितीने फेब्रुवारी २०२१ मध्ये अत्यंत कडक शब्दात मनपा प्रशासनाचे कान टाेचले होते. त्यानंतर मनपाने शुल्क लावण्याचे आश्वासन समितीला दिले. १ एप्रिलपासून शुल्क लावण्यात आला नाही. आता समितीने महापालिकेला अनुपालन अहवालच सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने शुल्क लावण्याची अंतिम प्रक्रिया सुरू केली.

महापालिकेच्या महसुलात भर घालण्यासाठी राज्य शासनाने ८ वर्षांपूर्वी शहारातील व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचे आदेश दिले. राज्यातील क वर्ग महापालिकांनी मागील काही वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली आहे. औरंगाबाद महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. नागपूर येथील महालेखाकार यांनी महापालिकेवर ताशेरे ओढले. त्यामुळे २०१८ मध्ये मनपा सर्वसाधारण सभेत व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचा ठराव मंजूर केला. शहरातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला. फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्याच्या लोकलेखा समितीने मनपा प्रशासनाला पाचारण करून आजपर्यंत अंमलबजावणी का केली नाही, अशी विचारणा केली. मनपाने १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे नमूद केले. आता तो कालावधीही उलटला. तरी मनपाने अनुपालन अहवाल सादर केला नाही. दोन दिवसांपूर्वीच कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडून मनपाला विचारणा करण्यात आली. आता थेट अनुपालन अहवालच सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे मनपाच्या करमूल्य निर्धारण विभागाने परवाना शुल्क वसूल करण्यासाठी अंतिम प्रक्रिया सुरू केली आहे.

आठ कोटींचे उत्पन्न अपेक्षितपरवाना शुल्कातून मनपाला दरवर्षी ८ कोटींचे उत्पन्न मिळेल. क वर्ग महापालिकेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच लहान मोठ्या व्यावसायिकांकडून शुल्क वसूल करण्यात येणार आहे.

आता शासनाला अहवाल सादर करावा लागणारव्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याच्या संदर्भात अनुपालन अहवाल सादर करावाच लागणार आहे. यासंदर्भात अंतिम तयारी सुरू आहे. लवकरच निर्णय होईल. मालमत्ता कर वसूल करणाऱ्या वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनच ही रक्कम वसूल करण्यात येईल.- अपर्णा थेटे, उपायुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर