शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकल्यावरून औरंगाबादेत पत्रकारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:36 IST

फेसबुकवर ब्राह्मण महिलांविषयी अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी शहरातील एका दैनिकाच्या पत्रकाराविरुद्ध रविवारी दुपारी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड करीत आहेत.

औरंगाबाद : फेसबुकवर ब्राह्मण महिलांविषयी अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी शहरातील एका दैनिकाच्या पत्रकाराविरुद्ध रविवारी दुपारी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड करीत आहेत.सुरेश पाटील असे गुन्हा नोंद झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. ते शहरातील एका दैनिकात वृत्तसंपादक आहेत. मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमाला असलेल्या कवी मनवर यांची कविता सध्या समाज माध्यमावर धुमाकूळ घालते आहे. त्या कवितेत आदिवासी मुलीविषयी रेखाटलेल्या ओळीमध्ये पाटील यांनी आदिवासी हा शब्द वगळून ब्राह्मण हा शब्द घातला आहे. दोन दिवसापूर्वी ही पोस्ट फेसबुकव झळकली व त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला.पोलिसांनी सांगितले की, ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा विजया प्रवीण कुलकर्णी, उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समितीच्या महिला संघटक विजया अवस्थी, राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळ, विप्र महिला समाज, आद्य गौड महिला मंडळाच्या सदस्यांनी रविवारी दुपारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सुरेश पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, फेसबुकवर सुरेश पाटील यांनी टाक लेल्या बीभत्स पोस्टमुळे ब्राह्मण महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी विजया कुलकर्णी यांची स्वतंत्र फिर्याद नोंदवून घेत पाटीलविरुद्ध भादंवि कलम २९४ आणि आय.टी. अ‍ॅक्टच्या कलम ६७ अन्वये गुन्ह्याची नोंद केली. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड हे तपास करीत आहे.शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्तांना भेटणारब्राह्मण महिला मंच, उत्तरदेशीय ब्राह्मण महिला मंडळ, ब्राह्मण गौड समाज महिला मंडळ आणि राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळांचे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटून निवेदन देणार आहेत. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस