सोयगाव तालुक्यात कुष्ठरोग, क्षयरोग तपासणी

By | Published: November 28, 2020 04:17 AM2020-11-28T04:17:08+5:302020-11-28T04:17:08+5:30

ही मोहिम राबवण्याचा उद्देश निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, त्यांची संसर्गिक साखळी रोखणे हा आहे. ...

Leprosy and tuberculosis examination in Soygaon taluka | सोयगाव तालुक्यात कुष्ठरोग, क्षयरोग तपासणी

सोयगाव तालुक्यात कुष्ठरोग, क्षयरोग तपासणी

googlenewsNext

ही मोहिम राबवण्याचा उद्देश निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, त्यांची संसर्गिक साखळी रोखणे हा आहे. या उपक्रमाअंतर्गत सोयगाव तालुक्यातील १ लाख २३ हजार ३९ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत कुष्ठरोग आणि क्षयरोगी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. ९६ कर्मचाऱ्यांचे तीन पथक तपासण्या करणार असून, घराघरात ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेसाठी तालुका समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सदस्य म्हणून प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि पर्यवेक्षक असणार आहेत. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५५ हजार ६९०, बनोटी येथे ४५ हजार १९४ आणि सावळदबारा येथे २२ हजार २२५ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी केले आहे.

Web Title: Leprosy and tuberculosis examination in Soygaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.