शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

' बिबट्या आला रे आला' ...औरंगाबादमध्ये व्हायरल खबरीने सारेच झाले सतर्क  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 19:26 IST

या वृत्ताविषयी वन विभागानेही शहराच्या लगत बिबट्याला सहज भक्ष्य मिळत असल्याने परिसरात बिबट्या वावर असू शकतो असे म्हटले आहे. यामुळे नागरिक व वन विभाग असे सारेच यातील सत्यता बाहेर येई पर्यंत  सतर्क झाले आहेत.

ठळक मुद्देसातारा-नक्षत्रवाडी परिसरात बिबट्याचे जलवाहिनीवर दर्शन झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरलवनविभागाने राबवली सर्च मोहीम 

- साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : सातारा-नक्षत्रवाडी परिसरात बिबट्याचे जलवाहिनीवर दर्शन झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झालं अन् पालकांनी मुलांना घराबाहेर पडू दिलं नाही. या वृत्ताविषयी वन विभागानेही शहराच्या लगत बिबट्याला सहज भक्ष्य मिळत असल्याने परिसरात बिबट्या वावर असू शकतो असे म्हटले आहे. यामुळे नागरिक व वन विभाग असे सारेच यातील सत्यता बाहेर येई पर्यंत  सतर्क झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून बिबट्याचे दर्शन होणे ही बाब नवीन राहिली नाही. वन विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी पिंजरे देखील लावून ठेवले आहेत. त्यावर वन कर्मचारी, वनरक्षकाची टिम देखील लक्ष ठेवून असतात. यामध्ये या टीमला बरेचदा शेतात बिबट्याच्या पायाचे ठस्से आढळून आले आहेत. यासोबतच शेतवस्तीवरील जनावरांवर हल्ल्याच्याही घटना तुरळक घडल्या आहेत.   

शहरात देखील वावर वेरूळ, वाळूज, गोलवाडी, तिसगाव, बनेवाडी, नक्षत्रवाडी, पैठण, गंगापूर,वैजापूर, कन्नड तसेच सातारा वनक्षेत्रात बिबट्या आढळून आला आहे. यासोबतच खामनदीच्या कडेला झाडा-झुडूपाचा आसरा असल्याने या परिसरात दोन वर्षापूर्वी बिबट्या आढळून आला होता. 

बिबट्या दिसल्याचे व्हायरल रेल्वेस्टेशनपासून ते नक्षत्रवाडी, कांचनवाडी, सातारा परिसरात डोंगराळ भाग असून सध्या तेथे जलसाठे देखील बर्‍यापैकी आहेत. याच भागात नाथ व्हॅलीजवळील जलवाहीनीवर गुरूवारी रात्री दिमाखात बसलेल्या बिबट्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. बिबट्याचे चमकणारे डोळे आणि चालतानाचे फोटो सोशल मिडीयावर आल्याने खळबळ उडाली. नागरिकांमधील अस्वस्थता टाळण्यासाठी या फोटो मधील सत्यता स्पष्ट होणे गरजेचे आहे अशी मागणी समाजसेवक दिपक पाडळकर यांनी केली आहे. 

सर्चिंग सुरू आहेयाबाबत उपवन संरक्षक एस.पी. वडस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, बिबट्या दिसल्याची  माहिती पुढे आली असून, खबरदारी म्हणून आम्ही सर्चिंग सुरू केली आहे. याची खात्री केल्यावरच अधिक माहिती देता येईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद