शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार दलालीत हरवले: देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 15:06 IST

मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही

औरंगाबाद : प्रत्येक अडचणीत शेतकऱ्यास आमच्या काळात पैसे मिळत होते. आता मात्र शेतकऱ्यांवर कोणी बोलत नाही, त्यांची वीज कापली जाते. रोज उठून पोपटपंची करायची, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचे नाही. शेतकरी संकटात असताना सरकार कुठे आहे ? राज्य सरकार मुंबईतील उंच इमारतीत दलाली करण्यात हरवले आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज लासूर येथे केली. 

लासुर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते १२० कोटींच्या विकास कामांचा उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या मेळाव्यात महिला बचत गट आणि दिव्यांग कामगारांना मदत देण्यात आली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मोदी सरकारने गोरगरिबांसाठी काय केले हे सांगत राज्य सरकारवर निशाण साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. ते म्हणाले, खूप दिल असे म्हणाऱ्यांच्या फक्त भाषणात मराठवाडा आहे, ते फक्त नाव वापरतात. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा या सरकारनें खून केला, कवच कुंडल काढून घेतली. आम्ही दुष्काळ मुक्त मराठवाड्याचे स्वप्न पाहिले होते, शेतकरी हताश होता, तेव्हा आम्ही मराठवाडा ग्रीड पाणी योजना आणली. समुद्रात वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणणार होतो, मात्र या सरकारने 'स्लो पॉयझन' देऊन ती योजना संपवली. औरंगाबादने शिवसेनेला ओळख दिली, या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना आम्ही दिली होती, मात्र सरकार बदलले आणि यांनी निर्णय बदलला. साधं पाणी हे लोक शहराला देत नाहीत, अशी खरमरीत टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली. 

राज्य सरकार दलाली करण्यात व्यस्त मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही... आता सरकार कुठं आहे कळत नाही मुंबईच्या मोठ्या इमारतीत , तिथल्या दलाली करण्यात सरकार हरवलं आहे... याना मराठवाड्यातील शेतकरी दिसत नाही. ही लोक शेतकऱ्यांची वीज कापताय आणि मोठ्यांना सोडतात. आपल्या सरकारने एका शेतकऱ्याची सुद्धा वीज कापली नाही. मात्र यांचं मंत्री म्हणतात वीज वापरली बिल भरावे लागेल आणि दुसरीकडे सगळ्या मंत्र्यांना मात्र फुकट वीज मिळते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेMarathwadaमराठवाडा