‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा आज शुभारंभ....!

By Admin | Updated: June 2, 2016 23:07 IST2016-06-02T22:58:11+5:302016-06-02T23:07:33+5:30

अहमदनगर : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षणाच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांना खुणावत आहेत.

Launch of 'Lokmat Aspire Education Fair' today ....! | ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा आज शुभारंभ....!

‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा आज शुभारंभ....!

अहमदनगर : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षणाच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. परंतु त्यापैकी कोणती वाट निवडावी, करिअरसाठी कोणत्या शाखेची निवड करावी असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. त्यांच्या याच प्रश्नांची उत्तरे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ मध्ये मिळतील. शिक्षणाचा महाकुंभ ठरणाऱ्या या प्रदर्शनाचा शुभारंभ शनिवारी होत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन गायकवाड सांस्कृतिक भवन, प्रेमदान चौक येथे सकाळी ११ वाजता पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे, महापौर अभिषेक कळमकर, आयुक्त दिलीप गावडे, पोलीस उपअधिक्षक बजरंग बनसोडे, न्यू इंडिया एश्योरन्स कं.चे प्रेमचंद मोरे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक प्रवीण करडे यांच्या हस्ते होत आहे.
३ ते ५ जून पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन होणार आहे. बारावीनंतर कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपसूकच मिळतील. सर्व शैक्षणिक संस्थांची तसेच सर्व अभ्यासक्रमांविषयी सखोल माहिती पुरविणारे हे प्रदर्शन असेल. पालक असो वा पाल्य दोघांच्याही मनात करिअरविषयी असलेल्या सर्व समस्यांचे याद्वारे निरसन केले जाणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.
विविध महाविद्यालये, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, आयटीआय, अ‍ॅनिमेशन गेमिंग तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस स्पर्धा परीक्षा संबंधित संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहे.
केजेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुणे, द न्यू इंडिया एश्योरन्स कं. लि. व स्टेट बँक आॅफ इंडिया, अहमदनगर शाखाचे प्रविण करडे, सहायक महाप्रबंधक हे या प्रदर्शनाचे असोसिएट स्पॉन्सर आहेत. तर रेडिओ सिटी हे रेडियो पार्टनर आणि निर्मल क्रिएशन हे आऊटडोअर पार्टनर आहेत.
अधिक माहितसाठी ९७६७१२८००६ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त पालक तसेच विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सेमिनार
कॉमर्स क्षेत्रातील विविध संधी (उ.अ. & उ.र)
आज दि. ३ जून २०१६. वेळ : सायं. ५ वा.
मार्गदर्शक : संदीप देसरडा सर, देसरडा-भंडारी प्रोफेशनल अ‍ॅकॅडमी.
सीईटी नंतरच्या प्रवेश प्रक्रियेपूर्वी महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालयांची माहिती मिळवा एकाच छताखाली.
अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये सहभागी संस्था
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अहमदनगर
अहमदनगर कॉलेज, अहमदनगर
अ‍ॅमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल, पुणे
बँक आॅफ महाराष्ट्र
देसरडा-भंडारी अ‍ॅकॅडमी, अहमदनगर
डॉ. एन. जे. पाऊलबुधे इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), नारायणडोह
अहमदनगर इन्स्टिट्युट आॅफ कॉप्युटर अकाऊंट (आय.सी.ए.)
केजेस् एज्युकेशनल इन्स्टिट्युट, पुणे
मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई

न्यू आर्टस् कॉलेज, अहमदनगर

परिक्रमा एज्युकेशन कॅम्पस्, काष्टी

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे ४प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी, लोणी

\राजाराम बापू कॉलेज शुगर टेक, इस्लामपूर

राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक, कर्जुलेहर्या

साईदीप आॅटोमोबाईलस् प्रा. लि. अहमदनगर 

सह्याद्री व्हॅली कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी राजुरी, जुन्नर

संजीवनी एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव

श्री छत्रपती ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट, नागपूर
श्री छत्रपती शिवाजी इंजिनिअरींग कॉलेज, नेप्ती

सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस् (व्हिआयटी), पुणे

सुर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट, पुणे
द न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि.

युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे ४विश्वभारती इंजिनिअरींग कॉलेज, अहमदनगर ४विवेकानंद कॉलेज आॅफ नर्सिंग, राहुरी.

Web Title: Launch of 'Lokmat Aspire Education Fair' today ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.