शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

देशव्यापी संपातून लातूरच्या सराफांची माघार

By admin | Updated: April 25, 2016 23:32 IST

लातूर : केंद्र सरकारच्या अबकारी कराविरोधात देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून पुन्हा बेमुदत बंदची हाक दिली आहे

लातूर : केंद्र सरकारच्या अबकारी कराविरोधात देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून पुन्हा बेमुदत बंदची हाक दिली आहे. मात्र या संपात शहर व जिल्ह्यातील सराफा व्यापारी सहभागी होणार नाहीत, असा निर्णय व्यापाऱ्यांच्यावतीने घेण्यात आला आहे. अशी माहिती लातूर जिल्हा सराफा सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन जाधव-रामेगावकर यांनी दिली. तब्बल ४४ दिवसांच्या आंदोलनानंतर पुन्हा मंगळवारपासून देशव्यापी आंदोलन सुरु करण्यात येत आहे. आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून, या प्रकरणी सोमवारी लातूर जिल्हा सराफा-सुवर्णकार असोसिएशनची बैठक घेण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित अबकारी कराविरोधात देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी पुन्हा मंगळवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील सराफा व्यापारी सहभागी होणार आहेत. मात्र या आंदोलनात लातूर शहरासह जिल्हाभरातील १२०० दुकानदार सहभागी होणार नसल्याचा निर्णय असोसिएशनच्या वतीने सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. या आंदोलनातून आम्ही माघार घेत असल्याचेही रामेगावकर यांनी सांगितले. तब्बल ४४ दिवस चाललेल्या आंदोलनात शेवटच्या टप्प्यात व्यापाऱ्यांत उभी फूट पडली होती. हा अनुभव लक्षात घेता, व्यापाऱ्यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलाविली होती. देशव्यापी संपात सहभागी व्हायचे असेल, तर एकजुटीने व्हावे अन्यथा संपातून माघार घ्यावी, असा विचार पुढे आला. संपातून माघार घेण्याबाबत एकमत झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)