शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

लोहारा परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2017 12:13 AM

लोहारा : शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह तासभर मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह तासभर मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला.मागील पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. विजेचा कडकडाट व वादळी-वारे वाहू लागले आहे. वादळीवाऱ्यामुळे ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडत आहेत. पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे नंतर मात्र उष्णतेत वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळपासून उन्हाची खूपच तीव्रता होती. अंगातून घामाच्या धारा निघत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. सायंकाळी वातावरणात बदल होऊन सव्वासहाच्या सुमारास शहरासह परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसास सुरवात झाली. मध्यम स्वरूपाचा एक तास पाऊस झाला. मागील शनिवारी सलग दोन दिवस वादळी पाऊस तालुक्यातील काही भागांत झाला होता. यात आंबा, द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. पुन्हा शुक्रवारी वादळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत अधिक भर पडली आहे. शहरासह हिप्परगा (रवा), नागूर, खेड, कास्ती, बेंडकाळ, मार्डी, नागराळ, मोघा, लोहारा (खुर्द) या भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता.