शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डी.पी. रोडवर चक्क शेती; औरंगाबाद मनपाची जागा ताब्यात घेण्यात दिरंगाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 12:36 IST

मयूर पार्क भागातील गट. क्र. १५७ मध्ये मनपाच्या ३६ मीटर डी.पी. रोडवर एका शेतकर्‍याने चक्क शेती सुरू केली होती. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबीच्या साह्याने रस्ता मोकळा केला.

ठळक मुद्देमहापालिकेने २००२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यानुसार शहराबाहेर जवळपास ६० पेक्षा अधिक डी.पी. रोड आहेत. यातील ८० टक्के डी.पी. रस्त्यांचे टीडीआरनुसार भूसंपादनही झाले आहेमात्र महापालिकेने १० टक्के जागाही ताब्यात घेतलेल्या नाहीत.

औरंगाबाद : महापालिकेने २००२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यानुसार शहराबाहेर जवळपास ६० पेक्षा अधिक डी.पी. रोड आहेत. यातील ८० टक्के डी.पी. रस्त्यांचे टीडीआरनुसार भूसंपादनही झाले आहे; मात्र महापालिकेने १० टक्के जागाही ताब्यात घेतलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यांचा वापर आजही खाजगी नागरिकच करीत असल्याची प्रचीती शुक्रवारी महापालिकेला आली. मयूर पार्क भागातील गट. क्र. १५७ मध्ये मनपाच्या ३६ मीटर डी.पी. रोडवर एका शेतकर्‍याने चक्क शेती सुरू केली होती. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबीच्या साह्याने रस्ता मोकळा केला.

जळगाव रोडवरील साई मेडिसिटीच्या बाजूने अत्यंत दाट लोकवस्ती झाली आहे. या भागातील नागरिकांना मुख्य रस्त्यावर ये-जा करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागत होता. महापालिकेने रस्ता सिमेंटने गुळगुळीत करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात जेव्हा काम सुरू करण्याची वेळ आली तेव्हा ३६ मीटर रस्त्यावर असंख्य अतिक्रमणे होती. एवढी अतिक्रमणे कशी काढायची म्हणून मनपाने जेवढा रस्ता आहे, तेवढेच सिमेंटचे काम करण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमणे काढा म्हणून एक गट सरसावला होता. दुसरा गट अतिक्रमणे ठेवून काम करा, अशी मागणी करीत होता. दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागी एका शेतकर्‍याने मका लावून ठेवला होता. त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट होते. शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने पोलीस बंदोबस्तात रस्त्याचा ताबा घेतला.

डी.पी. रोडवर प्लॉटिंगपडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा, हर्सूल आदी भागांत महापालिकेच्या डी.पी. रोडवर प्लॉटिंग टाकून भूमाफियांनी जागा विकल्या आहेत. महापालिकेने मागील आठ ते दहा वर्षांमध्ये सर्वच डी.पी. रस्त्यांचे टीडीआर दिले आहेत; मात्र जमीन मालकाकडून जागा ताब्यात घेतलेली नाही. भविष्यात जेव्हा महापालिकेला रस्ता करण्याची आठवण येईल, तेव्हा रस्त्यासाठी जागाच शिल्लक मिळणार नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद