शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'अखेरचा जय महाराष्ट्र'; माजी जिल्हा प्रमुखांनी कृष्णकुंजवरून प्रतिसाद नसल्याने मनसे सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 13:03 IST

जानेवारी २०२० मध्ये दाशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली ३० वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला होता.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस अगोदर पक्षाला एक धक्का बसला आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपद काढून घेतल्यानंतर अडगळीला पडलेले सुहास दाशरथे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. अडीच महिन्यात पक्षप्रमुखांनी एकदाही संपर्क साधला नाही, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनीदेखील विचारात घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे दाशरथे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जानेवारी २०२० मध्ये दाशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली ३० वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या नियुक्तीने पक्षात दोन गट पडले. विद्ममान जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर विरुद्ध दाशरथे असा शीतसंघर्ष पक्षात सुरू झाला. त्यानंतर कोरोना महामारीची साथ सुरू झाली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात दाशरथे यांनी आंदोलने केली. तसेच सेनेच्या मोर्चा विरोधातही बॅनरबाजी केली. ही पक्षाची संस्कृती नाही, असा ठपका दाशरथे यांच्यावर ठेवून त्यांचे पद काढून पुन्हा खांबेकर यांना देण्यात आले. यातूनच नाराज झालेले दाशरथे हे मनसैनिक म्हणून कार्यरत राहिले. आज पक्षप्रमुख बोलवतील, उद्या बोलवतील, अशा अपेक्षेवर असलेले दाशरथे यांना काही कृृष्णकुंजवरून सांगावा आला नाही. शेवटी त्यांनी सोमवारी सोशल मीडियातून मनसेला जय महाराष्ट्र केल्याचे जाहीर केले. दरम्यान, दाशरथे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मनसे सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे.

भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यतादाशरथे हे पुन्हा शिवसेनेत जातील, असे बाेलले जात आहे. परंतु आता त्यांना शिवसेनेत प्रवेश मिळणे अवघड आहे. आणि जर प्रवेश मिळाला तर त्यांना कधी व कोणते पद मिळणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे दाशरथे हे भाजपत जाण्याची दाट शक्यता आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा भाजपला किती फायदा होईल, हे आताच सांगता येणे अवघड आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे