शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सदनिका धारकांची लेबर कॉलनीत आज शेवटची सायंकाळ; उद्या पहाटेपासून सुरु होणार पाडापाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 11:53 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार सदनिकाधारकांना स्वत: हून घरे रिकामी करणे बंधनकारक, तसे न झाल्यास पोलीस बळाचा वापर

औरंगाबाद : विश्वासनगर-लेबर कॉलनीतील सदनिकांचा ताबा नागरिकांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत स्वत: हून सा. बां. विभागाकडे द्यावा. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने शांतता राखण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी शांततेत ताबा द्यावा, अन्यथा बुधवारी जिल्हा प्रशासन पहाटे ६ वाजेपासूनच पाडापाडीच्या कारवाईला सुरुवात करण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईत अडथळा आल्यास पोलीस बळाचा वापर होईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी लेबर कॉलनीच्या कारवाईच्या नियोजनासाठी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची शेवटची बैठक घेऊन ११ मे रोजी होणाऱ्या कारवाईबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी म्हणाले, साडेतेरा एकरवरील सरकारी निवासस्थाने सेवानिवृत्तीनंतर रिकामी करणे आवश्यक होते. परंतु विलंबाला बांधकाम विभागही जबाबदार आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार तेथील सदनिकाधारकांना स्वत: हून घरे रिकामी करणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास पोलीस बळाचा वापर करून घरे रिकामी करून त्यावर हातोडा चालविला जाईल.

कारवाई दरम्यान वाहतूक वळविणारलेबर कॉलनीच्या बाजूने शहरात जाणारे दोन मुख्य रस्ते आहेत. जळगावकडून येणारा रस्ता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टीव्ही सेंटरकडे जाणारा रस्ता. यावर सार्वजनिक व खासगी वाहतूक आहे. कारवाईच्या काळात या भागातून वाहतूक सुरू राहिल्यास अडथळा होण्याची शक्यता गृहीत धरून वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविण्यात येईल. लेबर कॉलनीकडे जाणारे सर्व रस्ते बुधवारी बॅरिकेटिंगने बंद केले जातील.

लेबर काॅलनी परिसरात उद्या कलम १४४ लागूदरम्यान, विश्वासनगर, लेबर कॉलनी येथे शासकीय निवासस्थानाची निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. त्या काळात लेबर कॉलनीच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी लागू केले आहे. 

पाडापाडीसाठी ही यंत्रणाअधिकारी-९५मनुष्यबळ- ४००जेसीबी-१२पोकलेन-५रुग्णवाहिका-८डॉक्टर-४

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादCourtन्यायालय