शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

वाळूजमहानगरात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:12 IST

वाळूजमहानगर परिसरात गळकी जलवाहिनी व व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात गळकी जलवाहिनी व व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. पाणी भरण्यासाठी काही उपद्रवींकडून या भागातील जलवाहिनी व व्हॉल्वही फोडले जात असल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. याकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जलवाहिनीची गळती थांबवून होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखाने, स्थानिक ग्रामपंचायती व सिडको प्रशासनाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तसेच जायकवाडी जलाशयातही अपेक्षित जलसाठा न झाल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने उन्हाळ्यात औद्योगिक क्षेत्र व नागरी वसाहतीत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात कपात झालेली आहे.

यामुळे वाळूजमहानगर परिसरात सर्वत्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना टँकर अथवा जारचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागली होती. आता पावसाळा सुरु होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे परिसरातील जलसाठे तसेच सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. या शिवाय जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातही पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जायकवाडी धरणात अत्यल्प जलसाठा आहे. पुढील काही दिवसात चांगला पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे. वाळूजमहानगर परिसरात सर्वत्र पाणी टंचाईचे संकट असतांना एमआयडीसी व सिडकोच्या जलवाहिनीतून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.व्हॉल्व्ह व जलवाहिनीतून गळतीबजाजगेट-वाल्मीरोडवरील पाटोदाजवळ एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती लागलेली आहे. कामगार चौकालगतही एमआयडीसीच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे.

या गळक्या जलवाहिनीवर पाणी भरण्यासाठी लगतच्या वसाहतीतील नागरिक तसेच कामगार चौकातील वाहनधारक, हॉटेल व इतर व्यवसायिक गर्दी करतात. ए.एस.क्लब चौकातील व्हॉल्वहमधून पाणी वाहून जात आहे. याच बरोबर सिडकोच्या जलकुंभाकडे जाणाºया जलवाहिनीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.

या विषयी एमआयडीसीची उपअभियंता प्रशांत सरग म्हणाले की, पाटोदा रोडवरील गळक्या जलवाहिनीची दुरुस्ती केली असून, उर्वरित ठिकाणीही दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :WalujवाळूजWaterपाणी