शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणे मित्राच्या मदतीच्या उपकारार्थ त्याच्या मुलाला जमीन दान; सालारजंगच्या वंशजाचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:48 IST

तीन दिवस मूळ जमीनधारकाची कसून चौकशी

छत्रपती संभाजीनगर : खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांचा चालक माझ्या मित्राचा मुलगा आहे. मित्राने मला केलेल्या मदतीच्या उपकारार्थ मी त्याला काल्डा कॉर्नर येथील जमीन दान दिली, असा अजब दावा हैदराबादस्थित सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत केला आहे. पोलिसांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची तीन दिवस कसून चौकशी केली. त्यात त्याने हिब्बानामासह अन्य कागदपत्रे देखील सादर केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

परभणीस्थित ॲड. मुजाहिद इकबाल खान समीरउल्ला खान यांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, सालारजंगचे वंशज मीर महेमूद अली खान यांनी त्यांना सदर जमिनीच्या पीआर कार्डवर नाव लावण्याच्या कायदेशीर लढाईसाठी नियुक्त केले होते. केस लढल्याच्या बदल्यात महेमूद यांनी फीसच्या मोबदल्यात सदर जमिनीचे ॲग्रीमेंट टू सेल, रजिस्टर्ड जीपीए व हिब्बानामा करून दिला होता. त्यासाठी मुजाहिद यांनी मीर महेमूद अली यांना रोख, बँकेद्वारे ९० लाख ते १ कोटी रु. दिले. मात्र, तरीही भुमरे यांच्याकडून मोठी रक्कम मिळाल्याने त्यांचे चालक जावेद रसूल शेख याच्या नावे त्याच जमिनीचा बनावट हिब्बानामा करून दिल्याचा आरोप तक्रारीत आहे.

चालक अनुपस्थितच, वंशजांची तीन दिवस चौकशीदरम्यान, चालक जावेद एकदा पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर झाला. त्यानंतर त्याने प्रकृतीचे कारण देत पोलिसांच्या नोटिसीला महत्त्वच दिले नाही. तर सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान यांची बुधवारपासून आर्थिक गुन्हे शाखेने कसून चौकशी केली. गुरुवार, शुक्रवार त्यांच्या मुला, मुलींना प्रश्न विचारण्यात आले. मात्र, सर्व कुटुंब जमीन दान दिल्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. प्राथमिक स्तरावर त्यांची चौकशी पूर्ण झाल्याने सद्य स्थितीत त्यांना पुन्हा बोलावण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस आता चालक जावेद बाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभाग