शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शेंद्रा, वाळूज ‘इंडस्ट्रियल रोड’च्या भूसंपादनाचा गुंता आणखी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 20:11 IST

भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या यादीत एनएच ७६३ म्हणून नोंद पैठण रोडबाबत काहीही निर्णय नाही 

- विकास राऊत

औरंगाबाद : केंद्रीय दळणवळण खात्याने २०१५ मध्ये जाहीर केलेल्या बीड बायपास आणि जालना रोड हे दोन्ही प्रकल्प नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने रद्द केल्यानंतर शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या इंडस्ट्रियल रोडच्या भूसंपादनाचा गुंता निर्माण केला आहे. डीएमआयसी आणि राज्य शासनाने भूसंपादन करण्याच्या नवीन तरतुदींमुळे अजून तरी याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. मात्र, केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या यादीत एनएच-७५३ म्हणून त्या रोडची नोंद झाली आहे. या रोडबाबत आठ महिन्यांपासून काहीही निर्णय न झाल्याने सदरील रोडचा प्रस्ताव अधांतरी आहे. 

भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे.जालना रोडसाठी फक्त ७४ कोटी मंजूर झाले आहेत, तर बीड बायपासचे काम पीडब्ल्यूडीकडे वर्ग करून प्रकरण संपविण्यात आले आहे. डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रियल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या इंडस्ट्री ट्रँगलसाठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा ९०० कोटींचा प्रस्ताव नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला होता. औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव या रस्त्यासह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा त्यांचा अंदाज होता. त्याचा डीपीआर होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्यात या कामांचे पाहू असे स्पष्ट केल्याने त्या रोडचे काम अधांतरी पडले आहे. 

पैठण रोडबाबत काहीही निर्णय नाही शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचेदेखील समायोजन होते. औरंगाबाद ते पैठण हा रोड भारतमाला या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे काम करावे लागेल, असे गडकरी यांनी १२ जानेवारी २०२० रोजी स्पष्ट केले होते; परंतु आठ महिन्यांत या रस्त्याबाबत काहीही नवीन निर्णय झालेला नाही. 

दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले अलायमेंटशेंद्रा, बिडकीन, वाळूज ते करोडीमार्गे हा रस्ता नॅशनल हायवेच्या यादीत आला आहे. औद्योगिक वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. ७६३ ए आणि बी अशी रस्त्याची नोंद दळणवळण खात्याकडे झाली आहे. नॅशनल हायवेचे अलायमेंट दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाले आहे. नॅशनल हायवे अ­ॅथॉरिटी आॅफ इंडियाने त्यांच्या यादीत हा रस्ता डीएमआयसीसाठी मंजूर करून घेतला आहे. डीएमआयसीकडून भूसंपादनासाठी तरतूद करावी लागणार आहे. आता अलायमेंटमध्ये बदल होणार नाही, असे दळणवळण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

काय म्हणाले होते गडकरी जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या रोडचा दुसऱ्या टप्प्यात विचार करू, सध्या काहीही सांगू नका, असे एनएचएआय, पीडब्ल्यूडीच्या बैठकीत स्पष्ट केले होते, तसेच औरंगाबाद ते पैठण हा  रोड भारतमाला या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे काम करावे लागेल, असेही गडकरी म्हणाले होते, परंतु आठ महिन्यांपासून काहीही निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :highwayमहामार्गfundsनिधीAurangabadऔरंगाबाद