शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहागंज ते सिटी चौक रस्त्यांसाठी भूसंपादन; विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडून मार्किंगही सुरू

By मुजीब देवणीकर | Updated: November 2, 2023 13:51 IST

सराफा रोड विकास आराखड्यानुसार १५ मीटर रुंद आहे. रुंदीकरणासाठी २०१८ मध्ये प्रक्रिया राबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहर विकास आराखड्यानुसार महापालिकेने शहरातील काही रस्त्यांचे भूसंपादन केले. मोजक्याच मालमत्तांचे भूसंपादन प्रलंबित होते. त्याकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. शहागंज ते सिटी चौक येथील मालमत्तांचे भूसंपादन करण्याचे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. सराफा येथे तर विशेष भूसंपादन कार्यालयाने मालमत्तांची मोजणी करून मार्किंगची प्रक्रियाही पूर्ण केली.

शहागंज ते सिटी चौक या १५ मीटर रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या मालमत्तेचे भूसंपादन केले जात आहे. भूसंपादनासाठी महापालिकेकडे ३० लाख रुपये भरण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांनी दिली. सराफा रोड विकास आराखड्यानुसार १५ मीटर रुंद आहे. रुंदीकरणासाठी २०१८ मध्ये प्रक्रिया राबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांनी २०२० मध्ये भूसंपादन प्रक्रिया राबविण्यासाठी मान्यता दिली; मात्र भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली नाही. विशेष भूसंपादन कार्यालयाने विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये सराफा रोडवरील पुरवार कुटुंबाच्या नगर भूमापन क्रमांक ६२०७ या मिळकतीचे ५०.८८ क्षेत्र बाधित होत आहे. या मालमत्तेचे भूसंपादन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. या मालमत्तेची मोजणी करून मार्किंगही करण्यात आली. भूसंपादनासाठी महापालिकेकडे ३० लाख रुपये जमा करावेत, असा प्रस्ताव विशेष भूसंपादन कार्यालयाने पाठवला आहे. मनपाकडून ३० लाख रुपयांचा निधी जमा होताच भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे विशेष भूसंपादन अधिकारी दहे यांनी सांगितले.

चंपा चौक ते जालना रोडची चर्चाचंपा चौक ते जालना रोड हा १०० फुटांचा रस्ता असून, जुन्या शहरासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर जवळपास ५०० पेक्षा अधिक मालमत्ता आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रशासक जी. श्रीकांत यांनी या भागात पाहणी केली. हा रस्ता खूपच आवश्यक असून, त्यासाठी काय करता येईल, याचा विचार करावा अशी सूचना प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिली. २०११-१२ मध्ये तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीही रस्त्याचा मुद्दा अजेंड्यावर घेतला होता. अनेक मालमत्ता पाहून त्यांनीही माघार घेतली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण